‘आम्ही जे काही करतो भव्यदिव्य करतो… ‘ गडकरींसह राज ठाकरेंनी लुटला फाउंटन शो चा आनंद

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) पुढचे पाच दिवस म्हणजेच २२ सप्टेंबर २०२२ पर्यंत विदर्भात (Vidarbha) असणार आहेत.

‘आम्ही जे काही करतो भव्यदिव्य करतो… ‘ गडकरींसह राज ठाकरेंनी लुटला फाउंटन शो चा आनंद

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) पुढचे पाच दिवस म्हणजेच २२ सप्टेंबर २०२२ पर्यंत विदर्भात (Vidarbha) असणार आहेत. या काळात ते केवळ नागपूरच नव्हे तर विदर्भातील इतरही विविध जिल्ह्यांना भेट देणार आहेत. या पाच दिवसांच्या दौऱ्यात ते अनेक पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. काही लोकांचे पक्षप्रवेशही पार पडतील असे सांगितले जात आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांचा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा म्हणून उल्लेख केला जातो आहे. विदर्भ दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांची भेट घेऊन फाउंटन शो चा आनंद देखील लुटला आहे.

नागपुरातील खासदार महोत्सवादरम्यान नागपुरातील फुटाळा तालाबातील कारंजे १६ ते १८ तारखेपर्यंत नागपुरातील जनतेसाठी सुरू करण्यात आले. हे औचित्य साधून काल दि. १८ सप्टेंबर रोजी राज ठाकरे हे कारंजे बघायला गेले. या ठिकाणी राज ठाकरे यांच्या स्वागता साठी स्वतः केंद्रीयमंत्री नितीन गडकरी पोहचले होते. नितीन गडकरी आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र बसून हा फाउंटेन शो पाहिला. फाऊंटन शो पाहून राज ठाकरेंनी गडकरींचे कौतुक केले आहे. फुटाळा लेकवरच्या लेझर शो पाहिल्यानंतर असे आजवर मी भारतात पाहिलेले नाही, असे जे काही पाहिले ते भारताच्या बाहेर पाहिले असं कौतुक राज ठाकरे यांनी केलं. “नितीन गडकरी खाली काहीच करत नाहीत. उड्डाणपूल ही वर जातो, कारंजे ही वर जातात. आमचे दोघांचे विचार मिळण्याचे कारण म्हणजे आम्ही जे काही करतो भव्यदिव्य करतो. मी जे काही आज पाहिले ते अद्भुत आहे. हे फक्त नागपूरच्या लोकांसाठी नाही तर देशातील लोकांसाठी पाहण्यासारखी गोष्ट आहे, असे कौतुक राज ठाकरे यांनी यावेळी केले.

नितीन गडकरी यांनी देखील यावेळी राज ठाकरे यांच कौतुक केलं. राज ठाकरे हे तज्ज्ञ कलाकार आहेत. यावेळी नितीन गडकरी यांनी फुटाळा लवात आगामी काळात मोठं हॉटेल उभारणार असल्याचं सांगितलं. “या तलावात ८० हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये हॉटेल बनवणार आहे. हे हॉटेल तलावात असेल आणि त्यासाठी बोटीने हॉटेलपर्यंत जाण्याची सुविधा करण्यात येणार आहे. शिवाय तलावाच्या शेजारी जवळपास ११०० वानांचे पार्किंग करण्यात येणार आहे. नागपुरात फुटाळा तलावामध्ये लोटस गार्डन बनवणार असून त्यासाठी कमळाच्या साडेसहाशे जाती गोळा करणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी म्हटलंय.

राज ठाकरे फक्त फाउंटन शो पाहण्यासाठी आले होते की नितीन गडकरींसोबत महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा करण्यासाठी, हे येणारा काळच सांगेल.

हे ही वाचा:

राज ठाकरे पोहोचले नागपुरातील फुटाळा तालाबमधील फाउंटन शो पाहण्यासाठी

शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट

संजय राऊत यांची आज सुटका होणार कि पुन्हा कोठडी ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version