वय काय, बोलतोय काय, काय चाललंय? राज ठाकरेंचा राज्यपालांवर घणाघात

वय काय, बोलतोय काय, काय चाललंय? राज ठाकरेंचा राज्यपालांवर घणाघात

मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे यांनी आज गोरेगावमधील नेस्को सभागृहात कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि भगतसिंग कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. निवडणुकीच्या पार्शवभूमीवर आज मुंबई मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गट अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि भगतसिंग कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलं. “आपलं वय काय? आपण बोलतोय काय? काय चाललंय या महाराष्ट्रात? राज्यपाल पदावर बसलाय म्हणून मान राखतोय. नाहीत तर महारष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलाय. मुंबईतील गोरेगावमधील नेस्को मैदानावर मनसेच्या गट अध्यक्षांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.

राज ठाकरे यांनी यावेळी राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतला. गुजराती आणि मारवाडी लोक महाराष्ट्रातून बाहेर गेले तर काय होईल? या राज्यपालांच्या वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. “गुजरातच्या आणि मारवाड्यांना प्रथम विचारा की, तुमच्या राज्यातून उद्योगासाठी तुम्ही महाराष्ट्रात का आलात? उद्योग धंद्यांसाठी महाराष्ट्रात सुपीक जमीन आहे म्हणून दुसऱ्या राज्यातील लोक येथे उद्योगांसाठी येत आहेत. महाराष्ट्र मोठा होता आणि तो कायम मोठा राहिल. महाराष्ट्रात काय आहे हे कोश्यारींकडून ऐकायचं नाही, असा टोला राज ठाकरे यांनी यावेळी लगावला.

“हा देश नव्हता तेव्हा या भागाला हिंद प्रांत म्हटलं जायचे. या हिंद प्रांतावर अनेक आक्रमणे झाली. पण, मराठेशाहीने या हिंद प्रांतावर सव्वाशे वर्षे राज्य केलं. महाराष्ट्र पहिल्यापासून समृद्ध होता. आता या गुजराती आणि मारवाडी लोकांना सांगितलं, आता तुमच्या राज्यात जाऊन उद्योग करा. तर हे जातील का? आजही परदेशातील कोणताही उद्योग देशात यायचा असेल तर पहिल्यांदा महाराष्ट्राला प्राधान्य देतो,” असे राज ठाकरेंनी सांगितलं.

हे ही वाचा : 

यांच्या आंगावर एकतारी केस आहे का ? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Raj Thackeray melava LIVE : कोरोना काळात ठाकरेंनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version