नड्डाजी यापुढे महाराष्ट्रात येताना बाळासाहेब ठाकरे हे नाव पाठ करून या, दानवेंचा जे.पी.नड्डाना इशारा

भाषणाच्या वेळी जे.पी.नड्डा बाळासाहेब ठाकरे यांचं नाव विसरले, त्यामुळे आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. त्यावरून देखील अंबादास दानवे यांनी ट्विट करत जे.पी.नड्डा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

नड्डाजी यापुढे महाराष्ट्रात येताना बाळासाहेब ठाकरे हे नाव पाठ करून या, दानवेंचा जे.पी.नड्डाना इशारा

भाजपने आगामी काळात म्हणजेच २०२४ मध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडुकीच्या प्रचारसभांना “मिशन १४४” अंतर्गत सुरुवात केली आहे. या प्रचारसभांसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. याच संदर्भात त्यांनी काल महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि औरंगाबादमध्ये सभा घेतली. या सभेच्यावेळी औरंगाबामध्ये अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचे पाहायला मिळाले. यावर शिवसेनेचे ठाकरे गटाचं नेते तसेच विधानसभा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, काल भाषणाच्या वेळी जे.पी.नड्डा बाळासाहेब ठाकरे यांचं नाव विसरले, त्यामुळे आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. त्यावरून देखील अंबादास दानवे यांनी ट्विट करत जे.पी.नड्डा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा भाजपच्या मिशन १४४ च्या अंतर्गत महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या मिशन अंतर्गत जे.पी.नड्डा यांनी काल महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि औरंगाबादमध्ये सभा घेतली यातील औरंगाबादच्या सभेच्या वेळी जे.पी.नड्डा बाळासाहेब ठाकरे यांचं विसरले. यावेळी बोलताना त्यांनी ‘बाळासाहेब ठाकरे’ यांचा उल्लेख ‘बाळासाहेब देवरस’ असा केला. त्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

यावेळी दानवे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे कि,”नड्डाजी यापुढे महाराष्ट्रात येताना बाळासाहेब ठाकरे हे नाव पाठ करून या. आज सभेत आपण त्यांचा ‘बाळासाहेब देवरस’ असा उल्लेख केला. जे बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख धड करू शकत नाहीत, ते त्यांच्या धगधगत्या विचारांचा वारसा काय सांभाळणार!”, अशा शब्दात त्यांनी नड्डा वर हल्लाबोल केला आहे.

त्याचबरोबर दानवेंनी काल औरंगाबाद जे.पी.नड्डा यांच्या सभेच्यावेळी खुर्च्या रिकाम्या होत्या त्यावरही टीका केली होती. त्यावेळी ते म्हणाले,”अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पहा हा खड्डा. लोक आपले भाषण सुरू होण्यापूर्वीच खुर्च्या सोडून गेले. संभाजीनगर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे.हे आज तुमच्याच साक्षीने जनतेने अधोरेखित करून टाकले आहे,” असं ट्विट केलं केलं होत.

हे ही वाचा:

अभिनेता शशांक केतकर असणार एका मोठ्या घोटाळ्याचा भाग, ‘त्या’ पोस्टमुळे आले चर्चांना उधाण

Shark Tank Season 2 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला , अश्नीर ग्रोव्हर आणि गझल अलघच्याजागी दिसणार हे परीक्षक

Shark Tank Season 2 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला , अश्नीर ग्रोव्हर आणि गझल अलघच्याजागी दिसणार हे परीक्षक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version