आपल्या राष्ट्रवादीवर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे – जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीराला आजपासून शिर्डीत सुरुवात झाली. या शिबीराच्या सुरुवातीला झेंडावंदन पार पडले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रास्ताविक केले.

आपल्या राष्ट्रवादीवर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे – जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीराला आजपासून शिर्डीत सुरुवात झाली. या शिबीराच्या सुरुवातीला झेंडावंदन पार पडले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. या प्रास्ताविकात जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती असल्याने सत्ताधार्‍यांकडून राष्ट्रवादीवर टिका होत आहे असा जबरदस्त आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी पक्षाला २३ वर्ष झाली आहेत. आदरणीय शरद पवारसाहेब या शिबिराला कालच येणार होते. मात्र ते उद्या येऊन मार्गदर्शन करतील असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

राज्यात सत्ता नसताना आपण केंद्रस्थानी होतो. हल्लाबोल आंदोलन केले. पदयात्रा काढली. त्यानंतर विदर्भात बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदत सरकारला द्यावी लागली. आज शेतकरी अडचणीत, अस्वस्थ शेतकरी आहे सरकार मात्र याकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी सरकारला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला निवेदन दिले मात्र सरकारने अद्याप ओला दुष्काळ जाहीर केला नाही याबद्दल तीव्र नाराजी जयंत पाटील यांनी व्यक्त केली. आपल्या मंत्र्यांनी चांगले काम केले हे जनतेला सांगण्याची गरज आहे. आपल्या पक्षाच्या माध्यमातून झालेली कामे पोचवा ती लोकांपर्यंत जायला हवीत असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केले त्या बंडखोरीशी काही संबंध नाही म्हणणारे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू हे एका फोनवर गुवाहाटीला गेले हे जाहीर सांगतात यावरून या बंडामागे कोण होतं हे लक्षात येते असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेतेमंडळी देखील उपस्थित होते.

हे ही वाचा :

Arvind Kejariwal : गुजरातसह दिल्लीत निवडणुकीचा धुरळा, केजरीवाल मोठ्या पेचात

‘… योग्य निर्णय घेण्यासाठी संजय शिरसाट यांना देव सद्बुध्दी देवो’ – सुषमा अंधारे

बारामतीत शरद पवारांना धक्का, सोमेश्वर कॉलेजला पवारांचे नाव दिल्याने शेतकरी कृती समितीचा आक्षेप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version