नाशिकला नवे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त कधी मिळणार?

राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या २ जून रोजी बदल्या करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर २०आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते.

नाशिकला नवे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त कधी मिळणार?

राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या २ जून रोजी बदल्या करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर २०आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यामुळे नाशिक महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली करण्यात आली. त्यांच्याकडे साखर आयुक्त म्हणून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे . तर संजीव जयस्वाल यांची म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे. मात्र, जयस्वाल यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पदाचा पदभार देखील कायम राहिला आहे. तर तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली. त्यांच्याकडे मराठी भाषा विभाग सोपवण्यात आला आहे.

यामुळे नाशिक महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची काही दिवसांपूर्वीच साखर आयुक्त (Sugar Commissioner) म्हणून बदली झाल्याने नाशिक महापालिका आयुक्त (Municipal Corporation Commissioner) पद हे सध्या रिकामं आहे त्या जागी अजून कोणताच अधिकारी नेला गेलेला नाही. आहे. तर नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी देखील जवळपास महिनाभरापूर्वी बदलीसाठी शासनाकडे विनंती केली होती. मात्र मर्जीतील अधिकारी आणण्यावरुन शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपमध्ये वाद सुरु असल्याने नवे महापालिका आयुक्त मिळत नाहीत तर जिल्हाधिकाऱ्यांची देखील बदली होत नसल्याच्या देखील चर्चा नाशिकमध्ये सुरु आहे. या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपच्या आजी माजी पालकमंत्र्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेलं शीतयुद्ध आता समोर आलं आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या दोन-तीन दिवसांमध्ये होतील, असं नाशिकचे माजी पालकमंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन यांनी रविवारी १८ जून रोजी स्पष्ट केलं होत. तर दोन-तीन दिवसांमध्ये नवे आयुक्त आणि जिल्हाधिकारी नाशिकमध्ये येतील तो निर्णय झाला आहे. एक-दोन दिवसात फाईलवर सह्या होतील आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं गिरीश महाजन म्हणाले होते.

परंतु अजून देखील या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे दिसून आले आहे. भाजप आणि शिवसेना युती मध्ये वाद सुरु झाले आहेत की काय? आणि म्हणून जागे संदर्भातला निर्णय घेण्यास अडथळा निर्माण होत आहे की काय? अशा चर्चाना उधाण आले आहे. यावर विद्यमान पालकमंत्री शिवसेना नेते दादा भुसे यांनी यावरुन कुठलाही वाद नसल्याचं सांगितलं. भाजप आणि आम्ही हातात हात घालून काम करतोय. अधिकाऱ्यांच्या बदल्या हा प्रशासकीय भाग असून यावर फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील,असं दादा भुसे म्हणाले. त्यामुळे आता अधिकाऱ्यांच्या बदल्या नक्की कोणामुळे रखडल्या ? नाशिकला नवे महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी नक्की कधी भेटणार ? आणि ते कोणाच्या मर्जीतील असतील ? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

Darshana Pawar हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीस अखेर अटक

कोविड सेंटर कथित गैरव्यवहार प्रकरणातील Sanjeev Jaiswal आणि Suraj Chavan यांचा काय संबंध?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version