ठाकरे गटाच्या सिलेब्रिटी चेहरा असलेल्या उर्मिला मातोंडकर, दीपाली सय्यद गेल्या कुठे?

ठाकरे गटाच्या सिलेब्रिटी चेहरा असलेल्या उर्मिला मातोंडकर, दीपाली सय्यद गेल्या कुठे?

काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये मोठा बंड झाला त्यानंतर खरी शिवसेना कोणती या वरून दोन्ही गटात वाद सुरु आहे. पण अशावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सिलेब्रिटी चेहरा असलेल्या दीपाली सय्यद आणि उर्मिला मातोंडकर गेल्या कुठे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अनेकवेळा दिपाली सय्यद यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वर जोरदार टीका केली आहे. शिंदे गट बाजूला झाल्यानंतर आणि शिवसेनेत फूट पडण्याआधी सुद्धा दीपाली सय्यद, उर्मिला मातोंडकर राजकारणात अॅक्टिव्ह होत्या. अचानक काय झालं या दोघी राजकारणात इतक्या घडामोडी सुरु असताना शांत झाल्या आहेत? तर दुसरीकडे ठाकरे गटात वादळी भाषण, वक्तव्य करणारा चेहरा सुषमा अंधारे यांच्या रुपात समोर आला आहे.

या वेळीच्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यात जोराद भाषण केल्यानंतर सुषमा अंधारे या चांगल्याच चर्चेत राहिल्या. अगदी काही महिन्यातच आपली एक वेगळी छाप पाडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या त्या एक रणरागिणी म्हणून समोर आल्या आहेत. मात्र सेलिब्रेटी रणरागिणी म्हणून शिवसेना ठाकरे गटात वावरणाऱ्या दीपाली सय्यद आणि उर्मिला मातोंडकर नेमक्या कुठे आहेत ? असा प्रश्न सर्वांना पडत आहे.

शिवसेना विभागली गेली असताना ठाकरे गट आपल्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचा काम करत आहे. त्यात शिवसेनेच्या रणरागिणी किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे, निलम गोऱ्हे या तर वेळोवेळी विरोधकांचा समाचार घेत आहेतच. पण त्याच पंगतीत पक्षात नुकत्याच आलेल्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांमध्ये आपली एक वेगळी छाप पाडली आहे. मात्र यामध्ये उणीव भासत आहे ती शिवसेनेच्या सेलिब्रेटी चेहरा असलेल्या दीपाली सय्यद आणि उर्मिला मातोंडकर यांची. त्यामुळे पक्षाला उभारी देण्याच्या अशा परिस्थितीत या दोघी नेमक्या कुठे आहेत? त्या सध्या काय करतात? हा प्रश्न चर्चिला जाणे स्वाभाविक आहे.

हे ही वाचा :

Ajit Pawar : राज्यातील विविध प्रश्नासंबंधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Prajakta Gaikwad: प्राजक्ता गायकवाड ‘या’ चित्रपटांमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version