पोलीसांनी अटक केलेला रॅपर राज मुंगासे आहे कुठे? जितेंद्र आव्हाडांची ट्विटद्वारे मागणी

Rapper Raj Mungase News : मागील काही दिवसांपूर्वी संभाजीनगर येथील तरुण रॅपर राज मुंगासे याने बनवलेला रॅप समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला होता. अनेक राजकीय नेतेमंडळींनी स्वतः या रॅपची दखल घेतली होती. सरकार विरुद्ध टीका केल्याने हा रॅप चांगलाच व्हायरल झाला होता.

पोलीसांनी अटक केलेला रॅपर राज मुंगासे आहे कुठे? जितेंद्र आव्हाडांची ट्विटद्वारे मागणी

Rapper Raj Mungase News : मागील काही दिवसांपूर्वी संभाजीनगर येथील तरुण रॅपर राज मुंगासे याने बनवलेला रॅप समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला होता. अनेक राजकीय नेतेमंडळींनी स्वतः या रॅपची दखल घेतली होती. सरकार विरुद्ध टीका केल्याने हा रॅप चांगलाच व्हायरल झाला होता. परंतु रॅप प्रकरणी पोलिसांनी राज याला अटक केली होती. त्यानंतर त्याला सोडवण्यासाठी त्याच्या कुटुंबियांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली. परंतु पोलिसांनी राज याच्या कुटुंबियांना सहकार्य न केल्याने आता याच्या भावाने राजकीय नेत्यांची मदत घेऊन माझ्या भावाचा शोध लागत नसल्याचे सांगत भावनिक साद घातली आहे. या प्रकरणी आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले असून राज मुंगासे यांच्या कुटुंबीयांनी थेट आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांना मोबाईलवरून संपर्क साधून राज मुंगासे याच्या भावाने राज बेपत्ता असल्याचे म्हटले आहे. त्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सरकारकडे त्याचा लवकर शोध घेऊन त्याची माहिती राज मुंगासे याच्या कुटुंबीयांना द्यावी अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.

राज मुंगासे कुटुंबीयांनी राज काही दिवसांपासून बेपत्ता असल्याचे त्याच्या भावाने आव्हाडांना मेसेज करून कळवले. त्यामुळे आता संभाजीनगरमधील पोलीस म्हणत आहेत की मुंबईमध्ये अटक आहे तर मुंबईमध्ये विचारपूस केल्यानंतर मुंबई पोलीस सांगत आहेत की, स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे राज याच्या कुटुंबीयांची चिंता अधिकच वाढली आहे. पोलिसांच्या कारभाराची तक्रार राज मुंगासेच्या भावाने जितेंद्र आव्हाड यांना मेसेज करून कळवला आहे. या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून पोलिसांनी राज मुंगासेच्या कुटूंबियांना सहकार्य करण्याची मागणी केलीय आहे. सोबतच प्रत्येक क्रांतीचा जनक आणि त्यांना लोकांपर्यंत घेऊन जाणारी लोकं गायक आणि कवीच असतात असं आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्येही अण्णाभाऊ साठे यांची गाणी आणि त्यांच्या डफ वरती वाजलेला होता हे कोणीच विसरू शकत नाही. त्याकाळी शाहीर जे होते त्यांनी ही चळवळ पेटवली होती. त्यामुळे अशा चळवळीमध्ये आग ओकण्याचे काम करत होते पूर्वी डफ होता आता रॅप आले. त्यामुळे एकाही रॅपरने कोणाचे नाव घेतले नाही. प्राप्त परिस्थितीनुसार प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्याच्या बाबतीत जे झाले आहे ते लोकशाहीला धरून नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे पायदळी तुडवले जात असल्याची टीका करत आम्हाला संविधानाने हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. असं म्हणत आव्हाडांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे.

हे ही वाचा : 

प्लॅनेट मराठीवर १४ एप्रिलपासून चिकटगुंडे २ राजकणार भूकंप?, अजित पवार भाजपाबरोबर जाणार? अंजली दमानियांचे ‘ते’ ट्वीट होतंय जोरदार व्हायरल नामदेव शास्त्रींचा पंकजा मुंडेंना टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version