‘बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना कोणती… ‘ मुख्यमंत्र्यांची जोरदार राजकीय टोलेबाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. “राजकारणात मी एकदा शब्द दिला की तो पाळतो,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.

‘बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना कोणती… ‘ मुख्यमंत्र्यांची जोरदार राजकीय टोलेबाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. “राजकारणात मी एकदा शब्द दिला की तो पाळतो,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं. तसेच मी एकदा शब्द दिला की स्वतःचंही ऐकत नाही, असंही नमूद केलं. यावेळी त्यांनी मंत्री संदीपान भुमरेदेखील दिलेला शब्द पाळतात, असं सांगितलं. ते सोमवारी (१२ सप्टेंबर) औरंगाबादमधील पैठणच्या सभेत बोलत होते.

जनावरांच्या लम्पी आजारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलीय. एनडीआरएफच्या निकषानुसार लम्पी आजारावर मदत करण्यात येणार आहे, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. औरंगबादमधील पैठण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी लम्पी आजारावर एनडीआरफच्या निकषानुसार मदत करण्यात येईल अशी माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या भाषणादरम्यान म्हणाले की, आजच आम्ही शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार परतफेडीचा निर्णय घेतला आहे. सतत पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, त्यांना मदत करण्यासाठीचा जीआर काढण्याचा निर्णय, गोगलगाईमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत निर्णय घेतयाल. तीन हेक्टर एवजी तीन हेक्टर शेतीला नुकसान भरपाई दिली पाहिजे याचा निर्णय घेतला. तसेच एनडीआरएफपेक्षा दुप्पट मदत देणयाचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना पाच हजार रूपये मिळत होते, तेथे आता १५ हजार रूपये देण्याचा निर्णय घेतला. जनावरांचा आजार लम्पी यासंदर्भात देखील एनडीआरएफचे निकष लावण्याचा निर्णय़ कॅबिनेट बैठकीत घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान राज्यात पुणे, जळगाव, नगर, अकोला, धुळे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यांतील जनावरांमध्ये ‘लम्पी स्कीन’ या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या प्रादुर्भावामुळे पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. आता सरकरने देखील आजाराबाबत गांभिर्य दाखवत मदतीची घोषणा केली आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजेत यासाठी हे सरकार कठिबध्द आहे, असे देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिले. पैठण येथे १०० खाटांचे रुग्णलयाची मागणी देखील सरकार मान्य करेल असेही सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना कोणती याचं उत्तर आजच्या या विराट सभेनं दिलं आहे. आजच्या सभेला सच्चा शिवसैनिकांची गर्दी आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी मला शिवकवण दिलीय की जे होणार आहे तेच बोलायचं. त्यामुळे मी दिलेला शब्द पाळतो. एकदा शब्द दिला की मी स्वतःचही ऐकत नाही. लोक विरोधातून सत्तेकडे जातात. परंतु, आम्ही सत्तेकडून विरोधात गेलो. त्यावेळी अनेकजण आमचा कार्यक्रम करण्याच्या तयारीत होते. परंतु, ५० जण सोबत असलेले सगळे विश्वासू होते. त्यामुळे आम्ही यशस्वी झालो. आमचा निर्णय हा जगातील एक मोठा इतिहास आहे. अडीच वर्षांचा वनवास भोगला. परंतु, आता सगळे आमदार हा वनवास संपला असे म्हणत आहेत. अडीच वर्षे समाजात नकारात्मकता पसली होती. परंतु, देवेंद्र फडणवीस आणि मी ठरवून निर्णय घेतला आणि जनतेच्या मानातील सरकार स्थापन केलं. आज जनतेमध्ये उत्साह आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

 

हे ही वाचा:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलेल्या रस्त्यावर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून केले शुद्धीकरण! औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार

पळवापळवीचे अनोखे रूप, मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवताच काही सेकंदातच १०० किलो पेढे, लाडू गायब

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version