spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जी कारवाई व्हायची असेल ती होऊ द्या; रोहित पवार

महाराष्ट्रामध्ये सध्या सत्ताधारी आणि विरोधक आपसात जोरदार भिडले आहेत. रोज नवीन आरोप प्रत्यारोप सुरु असतं. काही दिवसांपासून भाजपचे (BJP) आमदार राम शिंदे (Ram Shinde) आणि कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात सध्या चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं चित्र दिसत आहे. हे दोन्ही नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. राम शिंदेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कारखान्यावर कारवाईची मागणी केली आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतलाय. एखाद्या लहान मुलाला चॉकलेट नाही मिळालं की ते कसं करतं, तसं आमचं विरोधक करत असल्याचा टोला रोहित पवारांनी राम शिंदेंना लगावलाय.

बारामती अॅग्रो हा साखर कारखाना रोहित पवारांनी सुरु केला म्हणून राम शिंदे यांनी प्रथम साखर आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर साखर आयुक्तालयानं याप्रकरणी रोहित पवारांना क्लिन चीट दिली होती. त्यानंतर राम शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फढणवीस यांची भेट घेत बारामती अॅग्रोवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावरुन रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात चांगलाच सामना रंगला आहे. आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटलात, माझ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. जी कारवाई व्हायची ती होऊद्यात. मात्र, आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडं शेतकऱ्यांसाठी मदत तरी मागायची असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. लहान मुलांना चॉकलेट नाही मिळाल्यावर ते कसं करत तसं काम आमचे विरोधक करत असल्याचा टोला रोहित पवारांनी राम शिंदेंना लगावला.

तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटला होते, तेव्हा तुम्ही त्यांना ओला दुष्काळ जाहीर करा, सरसरकट पंचनामे व्हावेत असे एकादा पत्र द्यायचे होते, असे रोहित पावर म्हणाले. आमच्या विरोधकांना फक्त राजकारण कळतं. विरोधकांना आम्ही उत्तर देऊ त्याची काळजी तुम्ही करु नका. आम्ही तुमच्या बरोबर आहे. त्यांना शेतकऱ्यांचं हित माहीत नाही, ते त्यांना झेपणार पण नाही असेही रोहित पवार म्हणाले. म्हणूनच २०१९ ला तुम्ही मतांच्या माध्यमातून आशिर्वाद दिल्याचे पवार म्हणाले. विकासकामं करत असताना अडचमी येत असतात असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

हे ही वाचा :

सोसायटीच्या चेंबरमध्ये अडकून दोघांचा मृत्यू तर, तिसऱ्याचा शोध सुरु

Yogi Adityanath : लोकसंख्या नियंत्रण कायद्यापासून ते धर्मांतराच्या मुद्द्यावर, यूपीमध्ये भाजप सक्रिय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss