spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संसदेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतांना, खासदार अमोल कोल्हे त्यांचा माईक केला बंद

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल भाजप (BJP) नेत्यांकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये (Controversial statements) होत असताना यासंदर्भात संसदेने खास कायदा करावा, अशी मागणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) लोकसभेत बोलायला उभे राहिले. पण त्यांच्या ३ वाक्यानंतरच त्यांचा माईक बंद करुन पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल (Rajendra Aggarwal) यांनी त्यांचा आवाज दाबला. छत्रपती शिवराय देव नाहीत पण देवापेक्षा आम्हाला कमी नाहीत. त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करण्याची कुणाची हिम्मत होता कामा नये, असे अमोल कोल्हे सांगत असतानाच पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी “हो गया हो गया…” म्हणत विषय पूर्ण करण्याची सूचना केली. त्यानंतर पुढच्याच सेकंदाला अमोल कोल्हे यांचा माईक बंद करण्यात आला.

अमोल कोल्हे यांच्याबद्दल जे घडलं त्याबद्दल त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये अमोल कोल्हे यांनी म्हंटलंय, छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्यासाठी वेळ देण्यात आला होता. महाराजांवर अपमानजनक बोलणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी कायदा करावा ही मागणी करणार होते. माईक बंद केला तरी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची भावना दाबता येणार नाही असा टोला लगावत लगावला आहे. संसदेत खासदार डॉ अमोल कोल्हे यांचा ‘जय शिवराय’ आवाज घुमला असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. जरी आमचा माईक बंद केला तरी शिवभक्तांचा आवाज बंद करू शकणार नाही म्हणत कोल्हे यांनी विधानसभा अध्यक्षांवर नाराजी व्यक्त केली आहे.

माइक बंद केल्यानंतर शिवभक्तांच्या भावना किंवा आवाज कुणालाही दाबता येणार नाही, शिवभक्तांचा आवाज कानठीळ्या बसविल्याशिवाय राहणार नाही असाही टोला कोल्हे यांनी लगावला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमान करण्याची ख्याती कुणाचीही होऊ नये, मग कोणतेही संविधान पदावर असो कोणत्याही जबाबदारीच्या पदावर असेल त्यांची हिंमत होणार नाही यासाठी कायद्यात तरतूद करावी अशी मागणी कोल्हे यांनी यावेळी केली.

हे ही वाचा : 

उद्धव ठाकरेंच्या विरोधात प्राथमिक सुनावणी पडली पार

‘सिंघम अगेन’मध्ये ‘हि’ प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार ‘लेडी सिंघम’च्या भूमिकेत

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss