संभाजी ब्रिगेड संस्था कुणी स्थापन केली? आणि त्याचा इतिहास काय?

5 जानेवारी 2004 रोजी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे संभाजी ब्रिगेड लोकांच्या नजरेस पडण्यास सुरुवात झाली

संभाजी ब्रिगेड संस्था कुणी स्थापन केली? आणि त्याचा इतिहास काय?

संभाजी ब्रिगेड

नुकतीच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडने युती केल्याची घोषणा केली आहे. तस भागह्याला गेलं तर या दोन्ही पक्षांचा इतिहास तसा आक्रमकच आहे. हिंदुत्व, शिवाजी महाराजांचे विचार, मराठी माणसाचे हक्क आणि अधिकार अशा विविध मुद्दयांबाबतीत या दोन्ही पक्षांमध्ये साधर्म्य दिसून येते. शिवसेना हा बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला आणि नावारूपास आलेला पक्ष आहे. तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेड हा शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणार आणि २०१६ साली राजकारणात आलेला पक्ष आहे. त्यामुळे आता भविष्यात आता ही युती भाजपला कशी ठक्कर देणार, हे पाहणे आता महत्तवाचे ठरणार आहे. पण त्यापूर्वी संभाजी ब्रिगेड नक्की कुणी स्थापन केले? आणि याचा इतिहास काय आहे जाणून घेऊया:

पुरुषोत्तम खेडेकर यांनी या 1 सप्टेंबर 1990 रोजी या मराठा सेवा संघाची अकोल्यात स्थापना केली होती. मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील असणारे पुरुषोत्तम खेडेकर हे तेव्हा सार्वजनिक बांधकाम खात्यात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते. मराठा-कुणबी समाजातील सरकारी अधिकाऱ्यांना एका मंचावर आणून त्यांचं संघटन उभं करणं आणि समाजाचं प्रबोधन करणं हा प्रमुख उद्देश मराठा सेवा संघाच्या स्थापनेवेळी होता.

मराठा सेवा संघानं स्थापनेच्या काही वर्षांतच 32 ते 33 विभाग सुरू केले गेले आणि त्यातूनच पुढे जन्म झाला तो महिलांसाठीच्या जिजाऊ ब्रिगेड आणि तरुणांसाठीच्या संभाजी ब्रिगेडचा.

संभाजी ब्रिगेडने घेतलेल्या काही महत्तवाच्या भूमिका…

हे ही वाचा:

मदर तेरेसा यांची ११२ वी जयंती: जाणून घ्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित खास गोष्टी..

राज्यातील पहिले दिव्यांगांसाठी विशेष उद्यान नागपुरात लवकरच सुरु होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version