टेंभी नाका देवीच्या आरतीचा मान कोणाला?

राज्यासह (Maharashtra) संपूर्ण देशभरात नवरात्रोत्सव (Navratri 2022) धुमधडाक्यात साजरा होत आहे. मुंबईतही (Mumbai) नवरात्री जल्लोषात साजरी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

टेंभी नाका देवीच्या आरतीचा मान कोणाला?

राज्यासह (Maharashtra) संपूर्ण देशभरात नवरात्रोत्सव (Navratri 2022) धुमधडाक्यात साजरा होत आहे. मुंबईतही (Mumbai) नवरात्री जल्लोषात साजरी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच राजकीय पक्षांमध्येही नवरात्री साजरी करण्यावरुन चढाओढ सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. ठाण्याच्या टेंभी नाका (Thane Tembhi Naka) येथील देवी यावर्षी सर्वात जास्त चर्चेत आहे आणि याचे कारण देखील शिवसेनेमध्ये (ShivSena) पडलेली उभी फुट हेच आहे. सध्या राज्यातील प्रबळ पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेनेमध्ये (Shiv Sena) अंतर्गत बंडाळीमुळे फुट पडल्याचं पाहायला मिळत आहे. याचाच परिणाम नवरात्रोत्सवावरही झाल्याचं दिसत आहे.

२००२ यावर्षी आनंद दिघे यांचे निधन झाले. त्यानंतर ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी हा उत्सव सुरू ठेवला. महत्त्वाचे म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी टेंभी नाका येथील नवरात्र उत्सवाची (Navratri 2022) परंपरा बंद पडू दिली नाही. त्यामुळे देवीच्या आगमनाला अष्टमीला आणि विसर्जनाला देखील एकनाथ शिंदे स्वतः हजेरी लावतात. मात्र यावर्षी त्यांनी स्वतःचा वेगळा गट स्थापन करून भाजप सोबत सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट अशी उभी फुट सर्व शिवसेनेमध्ये पडली आहे. त्यामुळे ठाण्यात देखील दहीहंडीनंतर देवीच्या या उत्सवात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट अनेक वेळा आमने सामने आले आहेत.

हे ही वाचा : Thackeray vs Shinde : राज्याचा सत्तासंघर्ष तब्ब्ल एक महिना लांबणीवर

ठाण्यातील टेंभी नाका (Tembhi Naka) नवरात्रोत्सवात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते आज (दि. २९ सप्टेंबर) देवीची आरती पार पडणार आहे. आज रश्मी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवीचा जागर पार पडणार आहे. ठाण्यातील टेंभी नाका नवरात्रोत्सव म्हणजे, प्रसिद्ध मंडळांपैकी एक. टेंभी नाका येथे नवरात्रोत्सवाला सुरुवात आनंद दिघे यांनी केली होती. दरवर्षी अनेक राजकीय नेते मंडळी देवीच्या दर्शनासाठी येथे हजेरी लावत असतात. याठिकाणी रश्मी ठाकरे दरवर्षी आरतीसाठी येत असतात. अशातच, राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आज (गुरुवारी) रश्मी ठाकरे आल्या तर ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. कारण मंडळाकडून आज संध्याकाळची आरती आधीच शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या नावावर जाहीर करण्यात आली आहे. मंडळाच्या कार्यक्रमपत्रिकेत मीनाक्षी शिंदे आणि महिला आघाडीच्या नावावर आजची आरती जाहीर करण्यात आली आहे. मीनाक्षी शिंदे यांची ठाणे जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री यांनी नियुक्ती केली आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन्ही महिला आघाडी आमने-सामने येण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देवीच्या उत्सवात राजकारण नको असे सांगून राजन विचारे यांच्या नेतृत्वातील ठाण्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या देवीच्या दर्शनाला आले. मात्र आज उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या दरवर्षीप्रमाणे आरतीसाठी येणार असल्याची बातमी आल्याने पुन्हा एकदा दोन्ही गट आम्ही सामने येण्याची चर्चा रंगली आहे. कारण आजच्या संध्याकाळच्या आरतीचा मान शिंदे गटाच्या महिला आघाडीला देण्यात आला आहे. असे असले तरी रश्मी ठाकरे यांना आम्ही सन्मानाने वागणूक देऊ असे शिंदे गटाने सांगितले आहे.

ठाण्याची दुर्गेश्वरी असे नाव असलेल्या टेंभी नाका इथल्या देवीचा इतिहास हा अनोखा आहे. आनंद दिघे (Anand Dighe) यांनी सुरू केलेला नवरात्र उत्सव म्हणजेच टेंभी नाका येथील नवरात्र उत्सव. १९७८ सालापासून या उत्सवाची सुरुवात स्वर्गीय आनंद दिघे (Anand Dighe) यांनी केली. श्री जय अंबे मां सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्थेकडून हा उत्सव आयोजित केला जातो. या देवीच्या मूर्तीचे देखील एक वैशिष्ट्य आहे. आनंद दिघे यांना झालेल्या देवीच्या साक्षात्काराची त्यांनी तशीच्या तशी मूर्ती बनवून घेतली. तीच आणि तशीच मूर्ती आजतागायत घडवली जात आहे. स्वतः आनंद दिघे हे देवीची नऊ दिवस श्रद्धेने उपासना करायचे. हळूहळू टेंभी नाक्यावरील हा नवरात्र उत्सव ठाण्यात आणि ठाण्याच्या बाहेर देखील ख्याती मिळू लागला. अगदी बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, महापौर, हे अनेक वेळा या देवीच्या दर्शनाला येऊन गेले आहेत. फक्त शिवसेनेचेच नाही तर सर्वपक्षीय महत्त्वाचे नेते सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या देवीच्या दर्शनाला दरवर्षी येतात. तीच परंपरा पुढे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी देखील सुरू ठेवली होती.

दरम्यान, एकीकडे, मराठी दांडिया, दसरा मेळावा यावरून ठाकरे गट, शिंदे गट, भाजप यांचं राजकारण रंगलं असतानाच आता ठाकरे गटाकडून मुंबई ठाण्यात दोन दिवस देवीचा जागर केला जाणार आहे. हा जागर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ठाण्यातल्या टेंभी नाका इथे आनंद दिघे यांच्या देवीची आरती करणार आहेत. शिवसेनेतून सीमोल्लंघन केलेल्या शिंदेंनी दिघेंच्या नावानं आपली राजकीय वाटचाल पुढे ठेवली आहे. त्यातच आता रश्मी ठाकरे त्याच दिघेंच्या देवीची आरती करणार आहेत. त्यामुळे सध्याच्या राजकीय संघर्षात दिघेंची देवी कोणत्या गटाला पावणार आणि आज आरतीचा मान कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

‘देवदूत बस घोटाळाप्रकरणी’ मोठा खुलासा, लाखांची बस केली करोडोत खरेदी, फडणवीसांनी घेतली दाखल

पीएफआयवर बंदी घालण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं जाऊ शकत नाही- असदुद्दीन ओवैसी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version