मनोज जरांगेंना स्क्रिप्ट देतय कोण? याची पार्शवभूमी काय आहे? आमदार नितेश राणे

राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे.

मनोज जरांगेंना स्क्रिप्ट देतय कोण? याची पार्शवभूमी काय आहे? आमदार नितेश राणे

राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनोज जरांगे उपोषणासाठी बसले आहेत. आज त्यांनी आंतरवली सराटीमध्ये निर्णयक बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मराठा बांधवाना संबोधित करताना मनोज जरांगे आक्रमक झाले. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव होता, माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, मी आता सागर बंगल्यावर येतो, मला गोळ्या घाला, असे जरांगे म्हणाले. त्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

नितेश राणे म्हणाले, मला आता प्रश्न पडला आहे यांना आता यांना नेमके मराठा समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत की फडणवीस साहेबांच्या नावाने राजकारण करायचे आहे. मराठा समाजाला (Maratha Reservation) १० टक्के आरक्षण मिळालं आहे. आणि आता पुढे कोर्टाची जी लढाई लढली जाईल त्यासाठी सर्वात मोठा आधार हा फडणवीस साहेबांचाच मिळणार आहे. जो या अगोदर देखील मिळाला होता. तर मला विचारायचे आहे की, यांची स्क्रिप्ट देतय कोण? या मागची पार्श्वभूमीवर काय आहे? नेमके काय केले आहे फडणवीस साहेबांनी, असे नितेश राणे म्हणाले. मनोज जरांगेंना असे वाटत असेल तर आम्ही सगळे काय गप्प बसणार का? आम्ही पण मराठे आहोत. त्यांना पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत आहोत की राजकारण करू नका. उठ सूट फडणवीस साहेबांच्या नावाने टीका करायची, राजकारण करायचे, धमक्या द्यायच्या. एकाच नेत्यावर टीका का होत आहे. शरद पवारांवर, उद्धव ठाकरेंवर टीका का होत नाही. सगळे सोडून त्यांना फक्त एकच नेता दिसत आहे, त्यामुळे या स्क्रिप्ट मागे नक्की कोण आहे? असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला आहे.

काही दिवसांआधी मनोज जरांगे यांच्यावर काही नेत्यांनी आरोप केला होता. हे सगळं षड्यंत्र देवेंद्र फडणवीस यांचे असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. यावर नितेश राणे म्हणाले, मला आश्चर्य वाटत जे लोक त्यांच्या विरोधात बोलत आहेत ते जरांगे यांचे जुने सहकारी आहेत. आता त्यांना जर मनोज जरांगे यांच्या आंदोलन प्रामाणिकपणा दिसत नसेल फडणवीस साहेबांची काय चूक? असा प्रश्न नितेश राणेंनी विचारला आहे.

हे ही वाचा:

उलटा निर्णय देणारे, यांना कोण निवडून आणणार; चंद्रकांत खैरेंची राहुल नार्वेकरांवर टीका

फसव्या सरकारच्या चहापानावर महाविकास आघाडीचा बहिष्कार, विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version