‘धनुष्यबाण’ कोणाचा ? उरले फक्त काही तास…

‘धनुष्यबाण’ कोणाचा ? उरले फक्त काही तास…

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाला चांगलाच वेग आल्याचं दिसून येत आहे.काही महिन्यांपूर्वीच म्हणजेच जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अचानक केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं होत . एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट शिवसेनेवर आणि धनुष्यबाण शिवसेनेच्या मूळ चिन्हावर दावा सांगितला होता . त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात नेण्यात आले. आणि महाराष्ट्र सत्ता सत्तासंघर्षावरील सुनावणी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. पण शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचं याची निर्णय मात्र त्या आधीच होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे . याचे महत्वाचं कारण म्हणजे येत्या २३ जानेवारी २०२३ रोजी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आहे. पण पक्षाच्या आणि चिन्हाच्या बाबतीत सुरु असलेला कायदेशीर पेच संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ द्या अशी मागणी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे केली आहे. आणि आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय देईल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्यायची का? की थेट धनुष्यबाणाचा निर्णय द्यायचा याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission)घेईल. पण उद्धव ठाकरेंना संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी दिली तर ठाकरे गटाचं अस्तित्व मान्य केल्यासारखं होईल. त्यामुळे ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदासाठी मुदतवाढ किंवा धनुष्यबाण तसेच शिवसेना या पक्षावरुन निकाल येण्याचीच शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर, शिवसेनेत उभी फूट पडली. पण संख्याबळ आमच्याकडेच असून, आम्हीच शिवसेना असा दावा शिंदे गट करतोय.

आतापर्यंत ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांनीही कागदपत्र (document) सादर करत आपआपली भूमिका मांडलीय. आणि आपआपल्या विजयाचे दावेही सुरु झालेत.आता प्रश्न हा आहे की संख्या बळाच्याआधारे धनुष्यबाणाचा फैसला होईल की आणखी कोणत्या बाबीच्या आधारे. हे बघणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे.

हे ही वाचा:

राशी भविष्य, १७ जानेवारी २०२३, आजचा दिवस मैत्रीसाठी … 

घरातल्या घरात बनवा चविष्ट दाल बाटी

तुम्ही मूळव्याधाने त्रस्त आहात ? तर करा ‘हे’ व्यायाम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version