शिवाजी पार्कात कोणाचा दसरा मेळावा होणार? शिंदे की ठाकरे; संजय राऊत जोरदार टीका करत म्हणाले…

राज्यात नुकत्याच लोकसभा निवडणुका या पार पडल्या आणि आता लोकसभा निवडणुका नंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांकडे.

शिवाजी पार्कात कोणाचा दसरा मेळावा होणार? शिंदे की ठाकरे; संजय राऊत जोरदार टीका करत म्हणाले…

Dussehra Melava : राज्यात नुकत्याच लोकसभा निवडणुका या पार पडल्या आणि आता लोकसभा निवडणुका नंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांकडे. या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष हे आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. परंतु सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे राज्यात होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपारिक दसऱ्या मेळाव्याकडे. यापूर्वी राज्यात शिवसेनेचा एकच दसरा मेळावा पार पडायचा आणि हा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क होत होता. परंतु शिवसेनेत फूट पडणे नंतर राज्यात दोन दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले त्यामुळे आता शिवाजी पार्कमध्ये यंदा कोणाचा दसरा मेळावा रंगणार याच्यात चर्चांना चांगलाच उधान आला आहे याच मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

शिवसेनेसाठी दसरा मेळावा हा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. येत्या १२ ऑक्टोबर रोजी दसरा असून यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मुंबईतील दादर परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणजेच शिवाजी पार्क या ठिकाणी दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा रंगतो. ठाकरे गटाचे शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांनी दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवाजी पार्कातील मैदान मिळावे, यासाठी परवानगी अर्ज केला आहे. मात्र अद्याप यावर पालिका प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. ठाकरे गटाकडून तीन महिन्यांपूर्वीच याबद्दलचा परवानगी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर शिवसेनेच्या दोन गटांपैकी कोणाला सभा घेण्यास परवानगी मिळणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याबद्दल भाष्य केले. शिंदे गटाने मुंबईत दसरा मेळावा घेऊ नये, त्यांच्या दसरा मेळाव्याची जागा सूरतला आहे, कारण तिथे त्यांच्या शिवसेनेचा जन्म झाला आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. एकनाथ शिंदेंनी मुंबईत दसरा मेळावा घेऊ नये. तुमची दसरा मेळाव्याची जागा सूरतला आहे, जिथे यांच्या शिवसेनेचा जन्म झाला आहे. शिंदेंच्या शिवसेनेला दोन-अडीच वर्ष झाली आहेत. त्यामुळे यांना दसरा मेळावा घेण्यासाठी दोन जागा आहेत जिथे ते दसरा मेळावा आयोजित करु शकतात. यातील पहिलं ठिकाण म्हणजे सूरत आणि दुसरं म्हणजे गुवाहाटी. कामाख्या मंदिराच्या समोर किंवा ज्या हॉटेलमध्ये ते थांबले होते, तिकडे ते दसरा मेळावा घेऊ शकतात. सूरत हे सर्वात चांगला पर्याय आहे, कारण त्यांच्या पक्षाचा जन्म सूरत मध्ये झाला आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकांच्या निकालानंतर ठाकरे गटाने विरोधकांना डिवचलं, बाप को हात लगानेसे पहले…

‘मुंबईत हायअलर्ट’? दहशतवादी मोठ्या हल्ल्याची भीती, पोलीस ऍक्शन मोडवर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version