शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाला? थोड्याच वेळात सुनावणीला होणार सुरवात

शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाला? थोड्याच वेळात सुनावणीला होणार सुरवात

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाला चांगलाच वेग आल्याचं दिसून येत आहे.काही महिन्यांपूर्वीच म्हणजेच जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अचानक केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं होत . एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट शिवसेनेवर आणि धनुष्यबाण शिवसेनेच्या मूळ चिन्हावर दावा सांगितला होता . त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात नेण्यात आले. आणि महाराष्ट्र सत्ता सत्तासंघर्षावरील सुनावणी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. पण शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचं याची निर्णय मात्र त्या आधीच होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे . याचे महत्वाचं कारण म्हणजे येत्या २३ जानेवारी २०२३ रोजी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आहे. पण पक्षाच्या आणि चिन्हाच्या बाबतीत सुरु असलेला कायदेशीर पेच संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ द्या अशी मागणी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे केली आहे. आणि आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय देईल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.आता दोन्ही गटाचे वकील सुनावणीसाठी उपस्थित झाले आहे. तर थोड्या वेळातच शिवसेना कोणाची? आणि धनुष्यबाण कोणाला? याची सुनावणी सुरु होईल.

हे ही वाचा:

‘बाळासाहेबांचा राज’ उलघडणार काका-पुतण्याचे नाते, शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी होणार पहिला प्रयोग

हिंदी राष्ट्रभाषा करायला हरकत नाही तसा केंद्रसरकारने प्रयत्न करावा, अजित पवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version