spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवसेना कुणाची कुणाची? शिंदे आणि ठाकरे गटाने दिल्या प्रतिक्रिया

सध्या याच मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ही सुनावणी सुरू असताना महाराष्ट्राला पडलेला हा प्रश्न आज सुटेल असं वाटत आहे. अशातच शिंदे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे आमदारांच्या एका गटासह बाहेर पडले आणि शिवसेनेत फूट पडली आणि त्यानंतर राज्यात सुरुवात झाली शिंदे विरुद्ध ठाकरे अशा युद्धाला. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर शिंदे गट वेगळा झाला आणि त्यांनी शिवसेना पक्ष आणि त्यांच्या चिन्हावर आपला अधिकार सांगायला सुरुवात केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने एकदा शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर आता पुन्हा याच मुद्द्यावर वाद सुरू झाला आहे आणि त्यामुळे शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. सध्या याच मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ही सुनावणी सुरू असताना महाराष्ट्राला पडलेला हा प्रश्न आज सुटेल असं वाटत आहे. अशातच शिंदे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

शिवसेना पक्ष कुणाचा यावर बोलत असताना मुखमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आधी सुनावणी होऊ द्या. जे काही होईल ते नियमानुसार होईल आणि ते कायद्यानुसार व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. जे कायद्यानुसार आणि नियमांनुसार योग्य आहे ते व्हावं अशी आमची इच्छा आहे.”

आदित्य ठाकरेंनी देखील दिली प्रतिक्रिया…

सुनावणीबाबत आपले मत व्यक्त करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेना ही कुणाची आहे हे सर्वांचं माहीत आहे. शिवसेना ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची आणि त्याच्या सैनिकांची आहे. शिंदे गटाला टोला लागावी आदित्य ठाकरे यांनी पुन्हा शिंदे गटाच्या नेत्यांचा गद्दार असा उल्लेख केला आहे.

शिंदे गटाचे नेते दादा भुसे काय म्हणाले?

सुनावणीच्या मुद्द्यावर बोलत असताना दादा भुसे म्हणाले की, ही जी शिवसेना आहे तो हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची आहे. पण हे शिंदे गटाकडे जास्त आहे. मग ती खासदारांची संख्या असुदे, आमदारांची संख्या असुदे, शिवसेना पदाधिकाऱ्यांची संख्या असुदे किंवा मग शिवसैनिकांची संख्या असुदे आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे निकाल हा आमच्याच बाजूने लागेल. धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेच्याच बाजूने लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

ठाकरे गटाच्या मनीषा कायंदेंनी दिली प्रतिक्रिया…

मनीषा कायंदे म्हणाल्या, केवळ आमच्यतल्याच काही लोकांनी फुटून भारतीय जनता पार्टी बरोबर गट तयार केला एवढीच त्यांची ओळख अशा वेळेला निवडणूक आयोग मेरिट वर गेलं तर निश्चितच निकाल आमच्या बाजूने लागेल आणि धनुष्यबाण शिवसेनेलाच मिळेल यात कोणतीही शंका नाही.

अनिल परब काय म्हणाले…

आजची सुनावणी जी झाली ती शिंदे गटाचे मुद्दे, खोडून काढण्यासाठी होती. जे कपिल सिब्बल साहेब आणि देवदत्त कामात यांनी खोडून काढले आहेत. पक्ष म्हणजे फक्त आमदार किंवा खासदार नसतात ती एक राष्ट्रीय कार्यकारणी असते. त्या कार्यकारणी मेजोरीटी आमच्याकडे किती आहे हे आम्ही मांडलं आहे. जे मुद्दे त्यांच्या पेटेशांमध्ये होते ते मुद्दे आणि पेटेशांमध्ये ज्या त्रुटी होत्या, जी मोडतोड त्यांनी केली होती ती आम्ही दाखवून दिली आहे. त्यामुळे शिवसेना ही ठाकरे गटाचीच आहे, हे सिद्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानींच्या युक्तवादाला सुरवात

कामात- जेठमलानीच्या वादात आयोगाची मध्यस्थी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss