spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्या ठरणार ‘शिवसेना’ नक्की कुणाची; उद्धव ठाकरे म्हणतात, जे व्हायच ते होईल…

उद्या कोर्टात काय व्हायचं ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे.

शिवसेना नाकी कुणाची? धनुष्यबाणाचं चिन्ह नक्की कुणाचं? शिंदे – फडणवीसांची सत्ता टिकणार का? बंडखोर नेत्यांचं काय? बंडखोर नेते अपात्र ठरणार का? या सर्वच प्रश्नांची उत्तरं अखेर उदया मिळणार आहे. उद्याचा न्यायालयाचा निर्णय महाराष्ट्रातील सत्तानाट्याला एक वेगळे वळण देणार आहे. न्यायालय उद्या देणारा निर्णय हा महाराष्ट्रातील दोन बड्या पक्षांसाठी एक महतत्वाचा निर्णय ठरणार आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे या खटल्याच्या निकालाकडे लक्ष आहे.

या निकालाची आम्ही वाट पाहत आहोत, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सकाळी स्पष्ट केलं होतं. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही उद्या होणाऱ्या निकालावर भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की, “उद्या कोर्टात काय व्हायचं ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे.” “जनतेच्या भावना आपल्यासोबत आहेत,” असं उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले.”जनता गद्दारांना धडा शिकवेल,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे – फडणवीस सरकारलाही खडे बोल सुनावले आणि ते म्हणाले “यांच्याकडे सगळंच पैशांनी काम होतं. माझ्याकडे माझी रक्तामांसाची, जिवाला जीव देणारी माणसं आहेत. तुम्ही सदस्यपत्र घेऊन आलेला आहात तो मी पहिला टप्पा मानतो. कोर्टात काय व्हायचं ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. जनतेच्या भावना आपल्यासोबत आहेत. लोक निवडणुकीची वाट बघत आहेत. निवडणुका कधी एक येतात आणि या गद्दारांना आम्ही धडा शिकवतो. पण निवडणुका लवकर घेण्याची यांच्यात हिंमत आहे, असं मला वाटत नाही.”

महाराष्ट्रातील या सत्तानाट्याची सुनावणी खूप काळ झाला अजूनही सुरुच आहे. शिवसेनेतून एक गट बाहेर पडतो. त्यानंतर शिवसेनेची महाराष्ट्रातील सत्ता जाते. नवी युती होते. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाचे आणि भाजपा सरकार येते. नव्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होतो. पण तरीही एक प्रश्न प्रलंबित राहतो आणि तो म्हणजे शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? याच प्रश्नाच उत्तर मिळवण्यासाठी न्यायालयात आतापर्यंत ३ सुनावण्या झाल्या पण, न्यायालयाचं तारीख पे तारीख हे सत्र अजूनही चालूच आहे. सुरुवातीला ८ ऑगस्ट मग १२ ऑगस्ट आणि आता २२ ऑगस्टला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्यातरी शिवसेना कुणाची हे ठार का? आणि महाराष्ट्रातल्या या सत्तानाट्याला पूर्णविराम मिळणार का? , हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

मागून आलेल्यांना मंत्रिपद मिळालं; शिरसाटांनी व्यक्त केली नाराजी

Latest Posts

Don't Miss