यंदा शिवाजी पार्क कुणाचं? दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटात चढाओढ सुरु

त्यामुळे यावर्षी शिवाजी पार्क कुणाचं?, शिंदे गटाचं की शिवसेनेचं?

यंदा शिवाजी पार्क कुणाचं? दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटात चढाओढ सुरु

वरळीचं जांबोरी मैदान पटकावून दहीहंडी उत्सावाच्या वेळी भाजपने शिवसेनेवर (Shiv Sena) कुरघोडी केली होती आणि दसऱ्याच्या माध्यमातून याचीच पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत आता शिंदे गट आणि भाजप आहे. दरवर्षी शिवसेना आपला दसरा मेळावा दादरमधील शिवाजी पार्कात (Shivaji Park) आयोजित करते. पण, यावर्षी शिवसेनेतून बाहेर पडलेला आणि सत्तेत असलेला शिंदे गटसुद्धा यावेळी दसरा मेळवा. आयोजित करण्याचा तयारीत दिसत आहे. दसरा मेळावा हा लोकांना संबोधित करण्याचे एक उत्तम माध्यम आहे. त्यामुळे यावर्षी दसरा मेळावा आयोजित करत आणि शिवसेनेला मागे टाकत शिंदे निवडणुकांचे रणशिंग फुंकणार अशी चिन्ह आता दिसत आहेत.

येत्या 5 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कात दसरा मेळावा कुणी घ्यायचा यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवाजी आपल्याला मिळावं म्हणून शिवसेनेने महानगरपालिकेत अर्ज देखील दिला आहे. मात्र, अर्ज देऊन महानगरपालिका यावर काहीच हालचाल करताना दिसत नाहीये. त्यामुळे यावर्षी शिवाजी पार्क कुणाचं?, शिंदे गटाचं की शिवसेनेचं? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळावं म्हणून स्वत: उद्धव ठाकरे यांना लक्ष घालावं लागल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासक इक्बाल सिंग चहल यांच्याशी संवाद साधून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान देण्याची विनंती केली आहे. मात्र, सिंह यांनी परवानगीसाठी अद्याप कोणतीही कार्यवाई केलेली नाही. त्यामुळे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. एकनाथ शिंदे गटाला परवानगी मिळावी यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे.

जर यावर्षी शिंदे गटाला शिवाजी पार्कात दसरा मेळावा आयोजित करण्याची परवानगी मिळाली तर, शिंदे गटाकडून यंदा पहिल्यांदाच भव्य दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जाईल. शिवाजी पार्क मिळवण्यासाठी जसा शिवसेनेचा प्रयत्न सुरु आहे. तसाच प्रयत्न शिंदे गटाचा देखिल सुरु आहे. जर शिंदे गटाने दसरा मेळावा आयोजित केला तर, मुख्यमंत्री शिंदे त्या मेळाव्यात भाषण देणार आणि जनतेला संबोधणार हे नक्की आहे. पण, या दसऱ्या मेळाव्यात उंपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदी करणार साबरमती नदीवरील अटल पुलाचे लोकार्पण

लालबागच्या राजाच्या दरबारात यंदा होणार विक्रमी गर्दी.. सुधीर साळवी मानद सचिव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version