Sanjay Raut, तुम्ही मुके घ्या नाहीतर मिठ्या मारा, आमच्या लोकांना अटक का करता? संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

'मुका घ्या मुका' प्रकरणामध्ये शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांना अटक का करता? याच्याशी शिवसैनिकांचा संबंध काय? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला आहे.

Sanjay Raut, तुम्ही मुके घ्या नाहीतर मिठ्या मारा, आमच्या लोकांना अटक का करता? संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओ (Sheetal Mhatre Viral Video) प्रकरणी संजय राऊत यांनी टीका केली आहे. ‘मुका घ्या मुका’ प्रकरणामध्ये शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांना अटक का करता? याच्याशी शिवसैनिकांचा संबंध काय? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला आहे. व्हायरल व्हिडीओप्रकरणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना अटक करणं हा पोलिस यंत्रणेचा सत्तेचा गैरवापर आहे. अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांवर ते तुरुंगातून लवकर सुटू नयेत अशी कलम त्यांच्यावर लावली जात आहेत असं संजय राऊतांनी (Sanjay Raut) सांगितलं. आधी तो व्हिडीओ खरा की खोटा हे समोर येऊद्या असंही यावेळी राऊतांनी नमूद केलं आहे.

तो व्हिडीओ संबंधीत आमदाराच्या मुलाने शेअर केला आहे. त्याला अटक केली का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. मला असंख्य कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. आज आमच्या कार्यालयात पोलिस येत आहेत. ही तुमच्या गटातील अंतर्गत जर काही भांडणं असतील तर ती तुम्ही मिटवा. आम्हाला लक्ष्य करु नका असंही संजय राऊत म्हणाले. तुम्ही मुके घ्या नाहीतर मिठ्या मारा पण तुम्ही आमच्या लोकांना अटक का करताय? आमच्या लोकांना धमकी का देताय? असा सवाल राऊतांनी विचारला आहे.

 

माननीय सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सत्ता संघर्षाच्या लढ्यावर संजय राऊतांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. “निवडणूक आयोगानं विचित्र निर्णय दिला आहे. निवडूक आयोगाच्या निकालानंतर असं वाटलं की या देशातील न्याय संपला. तरीही आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढाई लढत आहोत. आम्हाला आशेचा किरण दिसत आहे. या देशाचे सरन्यायाधिश, देशाचं घटनापीठ आम्हाला न्याय देईल” असे राऊत यावेळी म्हणाले.

 

हे ही वाचा :

‘नाटू नाटू’ हे गाणं’ आणि ‘द एलिफंट विस्परर्स’ ऑस्कर 2023’मध्ये विजेते

‘Love jihad’ वरून आझमी, राणे आक्रमक, विधानपरिसरातच खडाजंगी। Abu Azmi – Nitesh Rane

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version