‘तळपता सुर्य’ हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदेगटाला का नाकारलं? कारण आलं समोर…

आज सकाळी शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड या तीन चिन्हांचा पर्याय ठेवला होता. तसेच शिंदे गटाकडून ‘तळपता सूर्य’ या चिन्हाला प्राधान्य असल्याचे सांगितले जात होते.

‘तळपता सुर्य’ हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदेगटाला का नाकारलं? कारण आलं समोर…

एकनाथ शिंदे बंड करून शिवसेनेमधून बाहेर पडले. त्यानंतर दसरा मेळाव्यावरून वाद झाले आणि अंधेरी पोट निवडणूकच्या पार्शवभूमीवर शिवसेना हे नाव धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले होते. आणि शिवसेना नाव वापरण्यास मनाई केल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला कोणतं चिन्ह आणि नाव मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर निवडणूक आयोगाने काल याबद्दलचा निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव तर ‘मशाल’ हे चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. शिंदे गटाला चिन्ह हे मिळाले नव्हते. परंतु अखेर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले.

शिंदेगटाच्या चिन्हांबद्दल बोलायचं झालं तर शिंदे गटाकडून आयोगाला तीन चिन्हांचा पर्याय देण्यात आला होता. मात्र, ती चिन्हं देण्यास आयोगान नकार दिला. त्यानंतर आज सकाळी शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड या तीन चिन्हांचा पर्याय ठेवला होता. तसेच शिंदे गटाकडून ‘तळपता सूर्य’ या चिन्हाला प्राधान्य असल्याचे सांगितले जात होते. मात्र, निवडणूक आयोगाने शिंदेगटाला ढाल-तलवार हे चिन्ह निवडणूक चिन्ह म्हणून दिले आहे. पण शिंदेगटाला तळपता सुर्य चिन्ह म्हणून का दिलं गेलं नाही यावर आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणालं निवडणूक आयोग?

नुसता सूर्य आणि उगवता सूर्य ही दोन्ही चिन्हं आधीच इतर पक्षांना देण्यात आली आहेत. फक्त गोलाकार, कोणतीही किरणं नसणारा सूर्य झोराम नॅशनलिस्ट पक्षाला देण्यात आला आहे. तसंच उगवता सूर्य डीएमके पक्षाला देण्यात आला आहे. तुम्ही मागणी केलेलं चिन्ह यांच्याशी मिळतं जुळतं आहे. तुमच्या चिन्हामुळे संभ्रम वाढेल. यामुळे तळपता सूर्य चिन्ह आम्ही नाकारत आहोत,” असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. तुम्ही दिलेलं चिन्ह सफरचंद, फुटबॉल यांच्याशीही मिळतं जुळतं आहे. त्यामुळेही संभ्रम निर्माण होऊ शकतो,” असंही निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

हे ही वाचा:

शिंदेगटाच्या नव्या चिन्हावर अंबादास दानवेंनी दिली प्रतिक्रिया म्हणाले, ढाल भाजपची आणि तलवार…

‘ढाल-तलवार’ निशाणी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version