शरद पवारांची इतक्या वर्षांची साथ का सोडली? दिलीप वळसे-पाटील म्हणाले…

राजकारणामध्ये आधी म्हणजेच १ वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे याणी बंड पुकारून शिवसेना शिंदे गट तयार केला तेव्हा त्यांच्या सोबत ४० आमदार देखील गेले आणि आता काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बंड पुकारला तेव्हा त्यांच्या सोबत ८ आमदारांचा समावेश होता

शरद पवारांची इतक्या वर्षांची साथ का सोडली? दिलीप वळसे-पाटील म्हणाले…

राजकारणामध्ये आधी म्हणजेच १ वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे याणी बंड पुकारून शिवसेना शिंदे गट तयार केला तेव्हा त्यांच्या सोबत ४० आमदार देखील गेले आणि आता काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बंड पुकारला तेव्हा त्यांच्या सोबत ८ आमदारांचा समावेश होता. त्यामुळे आता सत्तेमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बसलेले बघायला मिळत आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar) शपथविधीनंतर पुन्हा एकदा राज्यात अभूतपूर्व सत्तासंघर्ष उद्भवला आहे. त्यामुळे राजकारणात सर्वच पक्षामधून चर्चाना उधाण आले आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. संबंधित सर्व आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. या बंडखोरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत विश्वास मानले जाणारे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील अशा नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे संबंधित नेत्यांनी शरद पवारांची इतक्या वर्षांची साथ अचानक का सोडली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

शरद पवारांची इतक्या वर्षांची साथ का सोडली? याचं नेमकं कारण काय आहे? असं विचारलं असता दिलीप वळसे-पाटील म्हणाले, “याचं नेमकं एकच कारण आहे. या गटाच्या (अजित पवार गट) संदर्भात जे काही प्रश्न निर्माण झाले होते, ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माझ्या एकट्याचा नाही. हा सामुदायिक निर्णय आहे. ४० आमदारांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचं दुसरं काहीही कारण नाही. त्याचबरोबर शरद पवारांची साथ सोडल्याचं दु:ख आहे का? असं विचारलं असता दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले, शरद पवारांची साथ सोडली, याचं मनामध्ये १०० टक्के दु:ख आहे. परंतु कधी-कधी असे निर्णय घ्यावे लागतात.

मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असा वेगळा निर्णय घेतला आहे. मी आजपर्यंत पक्षाची शिस्त कधीही मोडली नाही. त्यामुळे साहजिकच हा निर्णय सामुदायिकपणे घेतला गेला. यामध्ये मला सहभागी व्हावं लागलं. आपण हा निर्णय घेतला असला तरी आपण कोणी ही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. आपली राष्ट्रवादी स्वतंत्र राहणार आहे. त्याद्वारेच आपण आपलं काम करणार आहोत, असं वळसे पाटील यांनी सांगितलं.

बाकी असल्याचं स्पष्ट होत आहे.

हे ही वाचा:

देशातील तीन राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणूक होणार

दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version