डझनभर साखर कारखान्यामध्ये जनतेच्या पैश्यांची लूट होत असताना ED का गप्प, संजय राऊत यांचा जोरदार हल्लाबोल

माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यांनतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) संतप्त झाले आहेत.

डझनभर साखर कारखान्यामध्ये जनतेच्या पैश्यांची लूट होत असताना ED का गप्प, संजय राऊत यांचा जोरदार हल्लाबोल

माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यांनतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) संतप्त झाले आहेत. त्यांनी हसन मुशीफ यांचा फोटो ट्विट केला आहे आणि किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांचा ‘महात्मा पोपटलाल’ असा उल्लेख केला आहे. डझनभर साखर कारखान्यामध्ये जनतेच्या पैश्यांची लूट होत होती तेव्हा ED गप्पा का होते? अशी विचारणा संजय राऊत यांनी ट्विटमधून केली आहे. हसन मुश्रीफ यांच्या सेनापती संभाजी घोरपडे साखर कारखान्याच्या संदर्भात ED ने कारवाई सुरु केली आहे.

महात्मा पोपटलाल हे त्यांच्या बेंबीच्या देठापासून ओरडत आहेत. अशा डझनावर साखर कारखान्यांमध्ये जेव्हा जनतेची लूट होते तेव्हा ED गप्प का? उद्या एका भ्र्ष्ट कारखान्याचे प्रकरण उपमुख्यमंत्रांकडे पाठवत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईडीकडून मुश्रीफांवर छापेमारी झाल्यांनंतरही कडाडून टीका केली आहे. आज संजय राऊत यांनी पुन्हा ट्विट करून हल्लाबोल केला आहे. हसन मुश्रीफ याना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. आज मुंबईमधील ईडी कार्यालयामध्ये मुश्रीफ यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ११ मार्चला मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीकडून तब्बल साडे नऊ तास छापेमारी करण्यात आली आणि कसून चौकशी सुद्धा करण्यात आली. या चौकशीनंतर ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे.

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्जाच्या प्रकरणामध्ये ईडीकडून मुश्रिफांसह कुटुबांची सुद्धा चौकशी सुरु आहे. जेव्हा मुश्रीफ घरी नव्हते तेव्हा दोनवेळा ईडीकडून छापेमारी झाली आहे. आतापर्यंत मुश्रीफांविरोधात ईडीकडून ३५ कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि मुरगुडमध्ये ४० कोटीच्या फसवणुसकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यामध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये दिलासा मिळाला आहे. ईडीकडून मुश्रीफांच्या कागलमधील निवासस्थानी दिवसभरात कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा तसेच मुलगा आबिद मुश्रीफ यांच्यासह पाज जणांचा जबाब घेतल्याची माहिती आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने यांनाही बोलावून मुश्रीफ यांच्यासंदर्भात माहिती घेतली असल्याचे समजते.

हे ही वाचा :

ईडीच्या कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांना भावना झाल्या अनावर

Satish Kaushik यांच्या मृत्यूप्रकरणाला वेगळं वळण? पोलिसांना सापडली औषधे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version