spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराजांच्या शिल्पात भुवईवर खोप का दाखवली? जबाब तो देना पडेगा! Amol Mitkari यांचं ट्वीट चर्चेत

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed in Malvan : नौदल दिनानिमित्त मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा 35 फूट पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर राजकोट किल्ल्यात शिवरायांचा भव्य असा पुतळा उभारण्यात आला होता. पण अवघ्या ८ महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी महायुतीवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे आता राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आले आहे.  आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियाद्वारे महाराष्ट्राचा इतिहास रचणाऱ्या राजांचा पुतळा असा कोलमडुन पडावा? असा सवाल उपस्थित केला आहे.

काय आहे अमोल मिटकरी यांचं ट्वीट? 

आपटे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर या शिल्पात खोप का दाखवली? काय या मागचा इतिहास? सर्व ठरवून केलंय का? की याच भरवशावर कंत्राट मिळवलं? जबाब तो देना पडेगा. महाराज माफ कराकुण्या तोंडानं माफी मागावी? महाराष्ट्राचा इतिहास ज्या नावाने दैदीप्यमान बनवलाय त्याच राजांचा पुतळा असा कोलमडुन पडावा? आणखी मोठा पुतळा उभारताय,मात्र ज्याला कंत्राट दिलं त्याची गुणवत्ता का तपासली नाही? हे चित्र वेदनादायी व असह्य आहे. कुण्या तोंडाने माफी मागावी. 

ही स्मारक उभारणी केवळ राजकीय हेतूसाठी 

मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर राजकोट किनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. नौदल दिनानिमित्त राजकोट येथे आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी या पुतळ्याचे अनावरण झाले होते. सोमवार दि. २६ ऑगस्ट रोजी ही घटना दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पुतळा कोसळल्याचे बोलले जात आहे.  शिवपुतळा परिसर सुशोभीकरणासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तरीही या पुतळ्याची दुरावस्था झाली. या प्रकरणाने शिवप्रेमींमध्ये तांडव सुरु आहे. ही स्मारक उभारणी केवळ आणि केवळ राजकीय दृष्टीने झाली असल्याची टीका आता सर्वत्र होत आहे.

हे ही वाचा:

“प्रधानमंत्रांसारख्या मोठ्या माणसाला काळे झेंडे दाखवता हे सर्वथा अनुचित आहे”; Dada Bhuse यांचे मंतव्य

“विकृत मानसिकता सत्ताधाऱ्यांमुळे होत असेल तर ही शोकांतिका”; Praniti Shinde यांचा सत्ताधाऱ्यांना टोला

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss