भाजपमध्ये प्रवेश करणार का प्रवेश? राजकीय चर्चांना अशोक चव्हाणांनी दिली पहिली प्रतिक्रिया

पण या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.

भाजपमध्ये प्रवेश करणार का प्रवेश? राजकीय चर्चांना अशोक चव्हाणांनी दिली पहिली प्रतिक्रिया

भाजपचे पदाधिकारी असलेल्या आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) यांच्या घरी गणपतीच्या निमित्ताने अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची काल भेट झाली. राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने ही बाब महत्वाची समजली जात आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण हे देखील भाजपाच्या वाटेवर अशी चर्चादेखील सुरु आहे. दोन्ही नेत्यांची ही भेट झाल्याचे आशीष कुलकर्णी यांनीही मान्य केलय. पण या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. आशिष कुलकर्णी यांच्याकडे कुठलीही चर्चा किंवा बैठक झाली नाही. काँग्रेसचा परवा दिल्लीला मोर्चा आहे, त्यामुळे मी उद्या दिल्लीला जाणार आहे, असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनीही मी आणि अशोक चव्हाण गणपतीमध्ये भेटलो होतो. आमची भेट नॉर्मल होती, अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सध्या गणेश उत्सव सुरु आहे. त्यानिमित्ताने राजकीय नेते हे एकमेकांच्या भेटीगाठीला जात असतातच, यामधून देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची भेट झालेली आहे. ती भेट काही उद्देशाने किंवा राजकीय हेतूने झाली असे नाही. त्यामुळे या भेटीतून कोणतेही गैरअर्थ काढू नयेत. शिवाय भाजपाला अशा भेटीतून वावड्या उठवण्याची जुनी सवय आहे. पण कॉंग्रेसमधून कोणीही फुटणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

आधीच केंद्रातील काँग्रेसमध्ये अनेकांनी राजीनामे दिले आहेत, तर राज्यातल्या काँग्रेसमध्येही अंतर्गत धुसफूस आहे. काँग्रेसचे दोन माजी मंत्री शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात लवकरच शपथ घेणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. तसेच काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांसह काही आमदार, काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाचा:

दसऱ्या मेळाव्यासाठी रस्सीखेच सुरूच; शिंदे गटाच्या सदा सरवणकरांनी केला शिवाजी मैदानासाठी महानगरपालिकेत अर्ज

बायचुंग भुतियांना हरवत माजी फ़ुटबॉल खेळाडू कल्याण चौबे बनले भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version