पुण्यातून अमित ठाकरे त्यांची जबाबदारी पार पाडणार का?

मनसे नेते अमित ठाकरे मंगळवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुण्यात उद्या लोकसभा निवडणुकी संदर्भात अमित ठाकरे बैठका घेणार आहेत.

पुण्यातून अमित ठाकरे त्यांची जबाबदारी पार पाडणार का?

मनसे नेते अमित ठाकरे मंगळवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुण्यात उद्या लोकसभा निवडणुकी संदर्भात अमित ठाकरे बैठका घेणार आहेत. पक्ष बांधणी, उमेदवार निवड, प्रचार अशा विविध मुद्यांवर या बैठका होणार आहे. पुणे लोकसभेच्या निवडणुकीची जबाबदारी अमित ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने उद्या पुण्यात महत्वाच्या बैठकांचे आयोजन केले आहे. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील पहिला खासदार पुण्यातून देण्याची जबाबदारी अमित ठाकरे पार पाडणार का? हे येत्या काळात स्पष्ट होईल.

पुणे शहर आणि जिल्हा कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा गड होता. या गडात भारतीय जनता पक्षाने छेद देत आपले बस्तान बसवले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था आणखी बिकट होणार आहे. महायुतीत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील कोणत्या जागा भाजपकडे येतील अन् अजित पवार गटाला काय मिळेल, हे निवडणुकीत ठरणार आहे. त्याचवेळी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे शहरावर लक्ष केंद्रीत केले आहे. राज ठाकरे यांनी पुण्याची जबाबदारी खास व्यक्तीवर दिली आहे.

पुणे लोकसभेतून भाजपचे गिरीश बापट खासदार होते. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त आहे. मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग चंदू बारणे तर शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे खासदार आहेत. जिल्ह्यात तीन पक्षांचे तीन खासदार असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे जिल्ह्यावर फोकस केले आहे. राज ठाकरे स्वत: वारंवार पुणे दौरे करत आहेत. त्यानंतर घराच्या व्यक्तीवर पुण्याची जबाबदारी दिली आहे. राज ठाकरे यांचे चिरंजीव मनसे नेते अमित ठाकरे पुण्यातून मनसेचा पहिला खासदार देणार का? याची चर्चा सुरु आहे.

हे ही वाचा: 

सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये पार पडली द्विपक्षीय बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली भीमाशंकराकडे प्रार्थना…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version