spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एकनाथ खडसे पुन्हा एकदा पक्षांतर करणार का?, राजकीय वर्तुळात चर्चा

राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. भाजप खासदार रक्षा खडसे यांनी अमित शाह आणि एकनाथ खडसे यांच्यात फोनवरुन चर्चा झाली असल्याचं माध्यमांशी बोलताना म्हटलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जाऊ लागले. अखेर खुद्द एकनाथ खडसे यांनीच या सगळ्यावर भाष्य करत स्पष्टीकरण दिलंय. ‘एकाच घरात दोन लोकं दोन वेगवेगळ्या पक्षात असणं काही नवं नाही. आमच्याही घरात तसं आहे’, असं त्यांनी म्हटलंय. शिवाय भाजपमध्ये जाण्याच्या वृत्ताचंही एकनाथ खडसे यांनी खंडन केलंय.

हेही वाचा : 

खा.नवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट,फसवून जातीचा दाखला मिळवल्याचा आरोप

एकनाथ खडसे पुन्हा भाजपात येणार आहेत का? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यावर थेट भाष्य करणं रक्षा खडसे यांनी टाळलं होतं. दरम्यान, आता खडसे आणि शाह यांच्यात फोनवरुन संवाद झाला असल्याचं समोर आलंय. या चर्चेत नेमकं काय घडलं, असा सर्वांना प्रश्न पडला आहे. मात्र, खडसे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. खडसे म्हणाले,’अमित शाह हे केंद्रीय गृहमंत्री आहे. त्यासाठी त्यांच्याशी फोनवरुन बातचीत केली होती’, असंही खडसे यांनी म्हटलंय. मुळात एकनाथ खडसे आणि अमित शाह यांच्यात भेट होणार होती. पण अमित शाह यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ही भेट शक्य होऊ शकली नाही. म्हणून फोनवरुन त्यांनी अमित शाह यांच्याशी संवाद साधला होता, अशी माहिती रक्षा खडसे यांनी दिली. त्यावरुन पत्रकारांनी रक्षा खडसे यांना आणखी एक महत्त्वाचा प्रश्न केला होता.

राशी भविष्य २४ सप्टेंबर २०२२, वृश्चिक राशीच्या लोकांनी कर्ज मागणी केली असेल तर मागणी पूर्ण होईल

२३ ऑक्टोबर २०२२ साली खडसेंनी भाजपला सोडचिट्ठी दिली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेऊन खडसेंनी राजकारणाच्या नव्या पर्वाला सुरुवात केली होती. आता पुन्हा एकदा शाहांसोबत झालेल्या फोनवरील चर्चेमुळे खडसें पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत की काय? यावरुन राजकीय चर्चा रंगल्यात. पण खडसेंनी हे फेटाळून लावलंय.

हिवाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी

Latest Posts

Don't Miss