Exclusive : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? पंडित राजकुमार शर्मा म्हणाले…

पुढील येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार. आणि दोघे एकत्र येऊन निवडणूक लढवतील आणि एकत्रित लोकांना आवाहन करतील.

Exclusive : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? पंडित राजकुमार शर्मा म्हणाले…

राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना नक्की कुणाची यावरून शिंदे-ठाकरे गटात वाद होऊ लागल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील दरी वाढत गेली. मात्र ठाकरे घराण्यातील इतर व्यक्ती एकनाथ शिंदेच्या जवळ येताना दिसतायत. बांद्रा इथे झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र जयदेव ठाकरे, यांच्या पत्नी स्मिता ठाकरे आणि मुलगा निहार ठाकरे हे उपस्थित होते. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कटुता आल्यानंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची देखील जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे लवकरच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. यावर देशातील जेष्ठ भविष्यवेत्ते पंडित राजकुमार शर्मा यांनी काय भाकीत केलं आहे ते पाहू.

पंडित राजकुमार शर्मा यांना एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हात मिळवणी करणार का? असा प्रश्न विचारल्या नंतर पंडित राजकुमार शर्मा म्हणाले कि,”मला अनेक जणांनी मला हा प्रश्न विचारला आहे. या प्रश्नावर मी १५ दिवसापासून अध्ययन करतोय.पुढील येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार. आणि दोघे एकत्र येऊन निवडणूक लढवतील आणि एकत्रित लोकांना आवाहन करतील. आणि एकनाथ शिंदे यांना जे ठाकरे नाव त्यांच्या सोबत असायला हवं आहे ते राज ठाकरे यांचे नाव असल्याच्या शक्यता आहेत.”

पुढे जेव्हा पंडित राजकुमार शर्मा यांना विचारले कि, राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या सोबत सहकाऱ्यांच्या भावनेने काम करू शकतात का? किंवा ते कोणाची सुपरसिटी आपल्या कॅरी करू शकतात का? त्यावर पंडित राजकुमार शर्मा यांनी सांगितले कि,”बाळासाहेबांनी आता पर्यंत कधी कोणतेही पद घेतले नाही. त्यांनी मंत्री बनवले मुख्यमंत्री बनवले पण स्वःता कोणतेही पद घेतले नाही. पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद घेतले. पण राज ठाकरे यांच्यामध्ये अशी कोणतीही अपेक्षा नाही. राज ठाकरे यांचे शिवसेनेवर असलेले प्रेम आजही आपल्याला माहित आहे. राज ठाकरे यांचे व्यक्तित्व बाळासाहेब ठाकरे यांच्या यासारखे आहे. लोकांना मदत करण्याचा स्वभाव, बाळासाहेबांसारखी वाणी, त्याचे सारखे प्रेम या सगळ्या गोष्टी राज ठाकरे यांच्यामध्ये आहेत. राज ठाकरे हे २३ जानेवारी २०२३ ते २३ जानेवारी २०२४ या दरम्यान सत्तेचे प्रमुख दावेदार सुद्धा राहणार असल्याचे मत पंडित राजकुमार शर्मा यांनी व्यक्त केले आहे.

यापुढे पंडित राजकुमार शर्मा यांनी म्हटलं आहे कि,”सत्ता बनतात,महाराष्ट्रातच पहा, कधी काली काँग्रेस ला शाईच्या देणारी शिवसेना काँग्रेस सोबत असे कधी कोणाला वाटले पण नव्हते, पण झाले ना मग राज ठाकरे तर शिवसैनिक आहेत ते का एकनाथ शिंदेसोबत येणार नाहीत. आणि suprimicy सोडा suprimicy कोणी नाही करत. आणि एकनाथ शिंदे तर एकदम साधा माणूस आहे. राज ठाकरे याना जर तुम्ही बोला कि तुम्ही मुख्यमंत्री बनणार का तर बोलेल अजिबात नाही, एकनाथ शिंदे चालेल का हो चालेल, देवेंद्र फडणवीस चालेल का तर हो चालेल, त्यामुळे एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस,आणि राज ठाकरे ही महायुती होऊन निवडणूक लढण्याची शक्यता आहे. पुढे जाऊन बाळासाहेब ठाकरे यांचे स्वरूप राज ठाकरे यांच्या रूपात एकनाथ शिंदे याना पुढे घेऊन जाण्याची देखील शक्यता आहे.
Exit mobile version