काश्मिरी पंडित पुन्हा आपापल्या घरी परत येतील का?, उद्धव ठाकरे

आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे विधानभवनाच्या परिसरात उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, आर्टिकल 370 हटवल्यानंतर देखील आम्ही समर्थन केले होते.

काश्मिरी पंडित पुन्हा आपापल्या घरी परत येतील का?, उद्धव ठाकरे

आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे विधानभवनाच्या परिसरात उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, आर्टिकल 370 हटवल्यानंतर देखील आम्ही समर्थन केले होते. आणि आज सुप्रीम कोर्टाने चे निर्देश दिले आहेत, त्याच मी स्वागत करतो.

हीच अशा आहे की, त्यांनी दुसरे आदेश दिलेत पुढच्या सप्टेंबर पर्यंत तिथेच निवडणुका झाल्या पाहिजे, त्या पण निवडणुका लवकरात लवकर होतील. तिकडच्या जनतेला खुल्या हवेत मतदान करण्याची संधी मिळेल आणि मिळाली पाहिजे. २०१९ मध्ये सुद्धा हा निर्णय घेताना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. आज सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने हा नियम कायम ठेवला आहे, त्याच मी स्वागत करतो. केंद्रातील मोदी सरकारनं ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यावेळी सरकारनं जम्मू काश्मीरचं दोन भागांत विभाजन केलं होतं. जम्मू काश्मीर आणि लडाख असं विभाजन करुन, दोन्ही भाग केंद्रशासित केले होते. केंद्राच्या या निर्णयाविरोधात कोर्टात 23 याचिकांद्वारे आव्हान दिलं होतं. याच प्रकरणी निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय देत, केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय योग्य आणि वैध होता, असं म्हटलं आहे.

तसेच पुढे काश्मिरी पंडित यांच्याविषयी बोलत असताना काश्मिरी पंडितांचा जो विषय आहे, आता उम्मीद करू की विश्वास? कोण गॅरंटी देईल? कारण गॅरंटीचा जमाना आहे. काश्मिरी पंडित परत येतील, याची गॅरंटी कोण देईल? कोण अशी व्यक्ती या देशात आहे? येणाऱ्या निवडणुकांच्या पहिले जे काश्मिरी पंडित घर सोडून बाहेर गेलेत, ते परत आपल्या घरी परत येतील याची गॅरंटी कोण देईल? प्रधानमंत्री याची गॅरंटी देतील? आम्हाला जाणून घ्यायचा आहे. पुढच्या वर्षीच्या निवडणुका होणार आहेत. त्या घेईपर्यंत किंवा घेण्यापूर्वी त्यावेळी कश्मिरी पंडितांना जबरदस्तीने घर सोडावं लागलं. तेव्हा एकमेव हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना महाराष्ट्रात आसरा दिला होता. आता मोदी ही गॅरंटी घेतील का? की देशभर पसरलेले हे काश्मिरी पंडित हे निवडणुकीसाठी मतदान करायला आपापल्या घरी परत येतील आणि खुल्या वातावरणात तेथील निवडणुकीत निवडणूक करतील. ही गॅरंटी मोदीजींनी घ्यावी ही माझी अपेक्षा आहे.

हे ही वाचा:

पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील चार विद्यार्थिंनीचा देवगडच्या समुद्रात बुडून मृत्यू

जालन्यात धनगर समाज आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग टायर पेटवून आंदोलन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version