माविआ मध्ये फूट पडणार ?

आता राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे.

माविआ मध्ये फूट पडणार ?
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला पदाचा कार्यभार हाती घेतला आहे. तसेच शिंदे गट आणि शिवसेनेत अजूनही शीत युद्ध सुरू आहे. रोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यात आता राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे विरोधकांनी यशवंत सिंन्हा यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. तर एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना देऊ केली आहे.
दरम्यान एकीकडे उध्दव ठाकरे यांचे खासदार मुर्मू यांना मतदान करण्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार हे यशवंत सिंन्हा यांना मतदान करण्यास सांगत आहेत. त्यामुळे याबाबतीत महाविकास आघाडी काय निर्णय घेणार? किंवा त्यांच्यात फूट पडणार का अशी चर्चा सगळीकडे रंगली आहे.
शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे आधीच नुकसान झाले आहे. आता हळूहळू अनेक नेते, पदाधिकारी सेनेतून बाहेर पडतायत. काही शिंदे गटात सामील होत आहेत. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षांची बैठक घेतली. बैठकीत यशवंत सिंन्हा यांना समर्थन देण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीला काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी, सीपीआयचे भालचंद्र कांगो व आरजेडी चे एडी सिंग उपस्थित होते. त्यामुळे पुढे काय काय घडते हे पहावं लागेल ?
Exit mobile version