झुकेंगे नही! म्हणत ईडीच्या कारवाईबाबत संजय राऊतांच पहिलं ट्विट…

ईडीने ताब्यात घेतल्यानंतर झुकेंगे नही! म्हणत राऊतांनी त्याच्या अटकेविरोधात ट्विट केले

झुकेंगे नही! म्हणत ईडीच्या कारवाईबाबत संजय राऊतांच पहिलं ट्विट…

ईडीने ताब्यात घेतल्यानंतर झुकेंगे नही! म्हणत

पत्राचाळ प्रकरणी आज ३१ जुलै रोजी सकाळी सात वाजता ईडीने संजय राऊतांच्या घरावर छापा मारला. त्यानंतर जवळपास नऊ तास संजय राऊत यांची चौकशी सुरू होती आणि आता ४.३० च्या सुमारास ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर झुकेंगे नही! म्हणत राऊतांनी त्याच्या अटकेविरोधात ट्विट केले आहे.

”या कारवाईल मी घाबरत नाही. अश्या प्रकरणानंतर अनेक जण पक्ष सोडून जातात. मात्र, संजय राऊत शिवसेना सोडून जाणार नाही. शिवसेना कमजोर करण्याचा प्रयत्न आहे. मी अधिकाऱ्यांना सहकार्य करतो आहे. माझ्यावर सुडाने कारवाई सुरू आहे. उद्धव ठाकरेंना त्रास देण्यासाठी माझ्यावर कारवाई सुरू आहे. कोणतीही नोटीस न देता ईडीचे अधिकारी माझ्या घरात घुसले”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, “जी कारवाई व्हायची ती होऊ दे, मी घाबरत नाही. राजकीय सुडापोटी हा सर्व खेळ सुरू आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. उद्धव ठाकरे, शिवसैनिक हे माझ्या पाठीशी आहेत. संजय राऊतला शिवसेनेमुळे राज्य व देश ओळखतो. संजय राऊत कधीच गुडघ्यावर चालत नाही, सरपटत नाही. निधड्या छातीने उभा राहतो आणि लढतो. त्यामुळे या कारवाईला देखील मी निधड्या छातीने सामोरं जाणार आहे. यातूनच महाराष्ट्राला बळ मिळेल.”

Exit mobile version