Parth Pawar यांची राजकारणात एन्ट्री होणार?

अजित पवार यांच्या नंतर त्यांच्या परिवारातील आणखी एक सदस्य राजकारणात हळू हळू सक्रिय होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार राजकारणात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Parth Pawar यांची राजकारणात एन्ट्री होणार?

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत अशातच राष्ट्रवादी पक्षात तर घडामोडींना उधान झाले आहे राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांनी राष्ट्रवादी मधून काढता पाय घेतला आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडले यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट तयार झाले या पाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये अनेक घडामोडी या घडतच राहिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेली अनेक वर्ष राजकारणात सक्रीय आहे. तसेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लोकसभेसाठी बारामती मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा होत आहे. तर आता अजित पवार यांच्या नंतर त्यांच्या परिवारातील आणखी एक सदस्य राजकारणात हळू हळू सक्रिय होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार राजकारणात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अजित पवार यांच्या सह त्यांचे पुत्र पार्थ पवार हे देखील राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चाना आता चांगलच उधाण हे आले आहे. अजित पवार यांनी पार्थ पवार यांना सहकारच्या माध्यमातून राजकारणात आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हा बँकेची निवड केली आहे. पार्थ पवार जिल्हा बँकेची निवडणूक लढवणार आहे. अजित पवार बारामती अ वर्ग मतदार संघातून निवडून आले होते. त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर या वर्गाची निवडणूक होणार आहे. उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीमुळे त्यांनी राजीनामा दिला होता, असे सांगितले जात आहे. परंतु पार्थ पवार यांच्यासाठी जागा निर्माण करावी, म्हणून तर त्यांन राजीनामा दिला नाही, अशी शक्यता आहे.

जिल्हा बँकेच्या रिक्त झालेल्या संचालकपदासाठी निवडणूक ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अजित पवार यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी पार्थ पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. पार्थ पवार यांच्यासोबत मदन देवकाते यांचे नाव संचालकपदाच्या निवडणुकीसाठी घेतले जात आहे. परंतु पार्थ पवारच ही निवडणूक लढण्याची सर्वाधिक शक्यता आहे.सहकार चळवळ पुणे जिल्ह्यात रुजवण्यात शरद पवार आणि अजित पवार यांची महत्वाची भूमिका आहे. यामुळे सहकाराच्या माध्यमातून पार्थ पवार यांना राजकारणात आणण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदाची निवडणूक सहकार खात्याकडून होणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार असून दुपारपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : 

धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीजेची योग्य तारीख, शुभ मुहूर्त जाणून घ्या

‘लंडन मिसळ’ चित्रपटात भरत जाधव झळकणार हटके भूमिकेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Exit mobile version