या विरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करू – दीपक केसरकर

एकनाथ शिंदेंना नेते पदावरून काढण्यात आलं त्याबद्दल सेनेला रीतसर नोटीस पाठवणार, एकूणच शिवसेनेच्या कारवाई विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत.

या विरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करू – दीपक केसरकर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी कारभार हाती घेतल्यावर त्यांच्या विरुद्ध शिवसेनेनं अनेक कारवाई सुरु केल्या आहेत. शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना नेते पदावरून काढलं आहे. याबद्दल शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रसार माध्यमांसमोर आपले मत मांडले.

शिवसेनेच्या या कारवाई विरोधात आम्ही ही कायदेशीर कारवाई करू शकतो, असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले. एकनाथ शिंदेंना नेते पदावरून काढण्यात आलं त्याबद्दल सेनेला रीतसर नोटीस पाठवणार, एकूणच शिवसेनेच्या कारवाई विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. यापुढे शिंदे सरकार महाराष्ट्राचा जास्तीत जास्त विकास करण्याकडे लक्ष देणार आहे. आम्ही अजूनही बाळासाहेबां चे शिवसैनिक आहोत असं ही आवर्जून त्यांनी सांगितलं. मागच्या अडीच वर्षांमध्ये आरोप – प्रत्यारोप करण्यातच सगळं गेलं, त्यामुळे जनतेकडे नकळत दुर्लक्ष झाले. ते प्रेम त्यांना परत मिळवून द्यायचे आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी एकत्र येऊन सहकार्य करावे. असं दीपक केसरकर म्हणाले.

Exit mobile version