spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संजय राऊत यांची आज सुटका होणार कि पुन्हा कोठडी ?

मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ (Patra Chawl) घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना नेते संजय राऊत यांची (Sanjay Raut) न्यायालयीन कोठडी आज संपत आहे.

मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ (Patra Chawl) घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना नेते संजय राऊत यांची (Sanjay Raut) न्यायालयीन कोठडी आज संपत आहे. आज संजय राऊत याना पुन्हा एकदा मुंबई सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. तर संजय राऊत यांनी दाखल केलेल्या जमीन अर्जावरही आजपासून सुनावणी सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज संजय राऊत यांना पुन्हा कोठडी होणार कि त्यांची आज सुटका होणार याबाबत आज निर्णय हा घेतला जाणार आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दखल केलेल्या जामीन अर्जावरही आजपासून सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) संजय राऊत यांच्याविरोधात पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी शुक्रवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केलं. यामध्ये ईडीने म्हटलं आहे की, या पुनर्विकासाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय राऊत यांचा केवळ सहभाग नसून त्यांनी यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी पडद्याआड राहून काम केल्याचे पुरावे सापडल्याचं ईडीनं या आरोपपत्रात नमूद केलेलं आहे. याशिवाय संजय राऊतांच्या जामीनाला विरोध करत ईडीनं स्पष्ट केलंय की, राऊत हे एक राजकिय व्यक्तिमत्व असल्यानं बाहेर येताच ते पुराव्यांशी छेडछाड करू शकतात, त्यामुळे तापस महत्त्वाच्या टप्यावर असताना संजय राऊत यांना जामीन देणं योग्य ठरणार नाही.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी रात्री उशिरानं ईडीनं अटक केली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. राऊत यांनी जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकेवर न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली. आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपतेय. त्यामुळे आज संजय राऊतांची कोठडी आणि जामीन अर्जावर एकत्रित सुनावणी होण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातील १ कोटी ८ लाखाचा व्यवहारदेखील संशयास्पद असल्याचे ईडीने कोर्टाला सांगितले. अशाच प्रकारे अनेक संशयास्पद आर्थिक व्यवहार ईडीला सापडले आहेत. या संशयास्पद व्यवहाराचा तपास ईडीला करायचे असल्याचे ईडीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले. संजय राऊत हे प्रभावशाली राजकीय व्यक्तीमत्व असल्याने तपासात आणि साक्षीदारांवर ते प्रभाव टाकू शकतात असे ईडीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले. या प्रकरणी एका महिला साक्षीदाराला त्यांनी धमकी दिली असल्याची बाब ईडीने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत राऊत यांना जामीन नाकारण्यात यावा अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली. त्यामुळे आज संजय राऊत यांना पुन्हा कोठडी होणार कि त्यांची आज सुटका होणार याकडे सर्वांचे लक्ष हे लागले आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत यांनी जामीनासाठी केला अर्ज

यंदा संजय राऊत यांचा गणेशोत्सव तुरुंगात!

संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss