Wednesday, October 2, 2024

Latest Posts

शिवसेना महाविकास आघाडीसोबत राहिल का? – प्रकाश आंबेडकर

आज प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आम्ही शिवसेना किंवा कॉंग्रेससोबत युती करण्यास तयार असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Aghadi chief Prakash Ambedkar) यांनी केलं आहे.

आज प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आम्ही शिवसेना किंवा कॉंग्रेससोबत युती करण्यास तयार असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Aghadi chief Prakash Ambedkar) यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीतून बाहेर पडून एकला चलो रे ची भुमिका स्वीकारू शकतात. कारण त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे. शिवसेनेचे हिंदुत्व वैदिक नाही, चातुर्वर्ण्य मानणारे नाही, त्यामुळं ते आम्हाला मान्य असल्याचे आंबेडकर यावेळी म्हणाले.

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेच काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच डाव्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. पण खरा प्रश्न हा आहे की उद्धव ठाकरेंनी हा पाठिंबा मागितला का? हा पाठिंबा न मागता इतर पक्षांना दिला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या ब्लॉक करावं लागले असेही आंबेडकर यावेळी म्हणाले. सध्या शिवसेना महाविकास आघाडीसोबत राहिल का? याबाबत माझ्या मनात शंका असल्याचेही आंबेडकर यावेळी म्हणाले.

ठाकरे कुटुंब आणि आंबेडकर कुटुंब यांच्यात तीन पिढ्यांपासून संबंध आहेत. उद्धव ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अनेक उपक्रमांमधे सहभागी झाले होते असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. प्रबोधन ठाकरे यांनी सुद्धा मनस्मृतीचा निषेध केला होता असे आंबेडकर म्हणाले. बाळासाहेबांपासून आत्तापर्यंत शिवसेनेने मनस्मृतीचे समर्थन केलं नसल्याचे आंबेडकर म्हणाले. आम्ही शिवसेना किंवा कॉंग्रेससोबत युती करण्यास तयार आहोत. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आला नसल्याचे आंबेडकर यावेळी म्हणाले. बऱ्याच वर्षांनी सर्वच राजकीय पक्षांना समजोत्याच्या राजकारणाची जाणीव झाली आहे.

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी. एन. साईबाबा (Prof. G.N. Saibaba) यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणावर देखील प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. साईबाबा यांनी पुढं येऊन बोलण्याचे धाडस दाखवले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर याांनी घटनेत नमुद केलं आहे की, जर संघराज्याला धोका लागत असेल तर त्यांनी युएपीए सारख्या कायद्याचा वापर करावा असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. आर्थिक विषमता आली तर देशाचा ढाचा उन्मळून पडेल असंही डॉ. बाबासाहेब आंबेजकर यांनी सांगितलं होतं असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. एल्गार परिषद प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी कोणीही एकजण पुढे आला तर त्याचा खटला चालवण्यास मी तयार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हे ही वाचा :

अंधेरी निवडणुकीच्या दिवशी ‘सार्वजनिक सुट्टी’ जाहीर

दिवाळीपूर्वी सर्वसामान्य जनतेला महागाईचा फटका; दूध देखील महागलं

Andheri By Poll Election 2022 : ठाकरे गटाच्या आक्षेपामुळे भाजप आमदार मुरजी पटेलांना लढवता येणार नाही निवडणूक?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss