ठाकरे गटाची ऑफर स्वीकारणार का? पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्या मनात…

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये सध्या नाराजी सत्र सुरु असल्याचं दिसून येत आहे. त्यातील भाजप नेत्या पंकजा मुंडे या देखील भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा होत असतात.

ठाकरे गटाची ऑफर स्वीकारणार का? पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्या मनात…

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये सध्या नाराजी सत्र सुरु असल्याचं दिसून येत आहे. त्यातील भाजप नेत्या पंकजा मुंडे या देखील भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा होत असतात. त्याचबरोबर पंकजा यांनीही अनेकवेळा पक्षाच्या नेत्यांवर टीका करून आपली नाराजी व्यक्त करताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटातून पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर देण्यात आली होती. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमात असतात तिथे पंकजा मुंडे नसतात अश्या देखील चर्चा अनेक रंगल्या आहेत. या सर्व रांगेतल्या राजकीय चर्चावर अखेर पंकजा मुंडे यांनी मौन सोडलं आहे. माझ्या मनात कोणतीही खदखद नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे ठाकरे गटात जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार प्रीतम मुंडे गेवराईत एकत्र आले होते. यावेळी मीडियाने पंकजा मुंडे याना अनेक प्रश्न विचारे आणि अखेर त्यांनी मौन सोडले आहे.

यावेळी माध्यमांनी पंकजा मुंडे याना ठाकरे गटाच्या ऑफरबाबत विचारना केली त्यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी उत्तर दिलं आहे. अध्यक्षांच्या उत्तराला मी परत ओव्हरटेक करत नाही. माझ्या प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलं हीच मोठी गोष्ट आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच देवेंद्र फडणवीस जिथे असतात तिथं तुम्ही नसतात अश्या चर्चा रंगत आहेत या प्रश्नांवर पंकजा मुंडे म्हणल्या, मीही ती चर्चा ऐकली आहे. यावर वेगळी पत्रकार परिषद घेईल. परंतु माझ्या मनात कोणतीही खदखद नाही. अश्या कोणत्याही बॅट्या लावण्याचं कारण नाही असं देखील त्या म्हणाल्या आहेत. फडणवीस ज्या कार्यक्रमाला आले, त्या कार्यक्रमात मी अपेक्षित नव्हते. त्यामुळे मी आले नाही. आज प्रदेशाध्यक्ष आले म्हणून मी आले. जेपी नड्डा आले मी आले.तसेच मी भाजपच्या संस्कारात वाढलेली, मुशीत वाढलेली सच्ची कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी पक्षाचा प्रोटोकॉल पाळते. पण कुणाच्याही सार्वजनिक आणि पक्षाच्याबाहेरच्या कार्यक्रमाला जाणं मला कंपल्सरी नाही, असं त्या म्हणाल्या.

हे ही वाचा:

मुंबई मेट्रो 2A आणि 7 झाले उद्घाटन, आजपासून प्रवासासाठी खुल्या होणाऱ्या मेट्रोची सविस्तर माहिती घ्या जाणून

संजय राऊतांनी केली मोठी घोषणा, ठाकरे गट जम्मूत लढवणार विधानसभेच्या निवडणुका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version