शिंदे – फडणवीस सरकारच्या 12 नावांची यादी राज्यपाल करणार का मंजूर?

राज्यपाल नियुक्त नावांसाठी नव्या 12 नावांची यादी आता राज्यापालांकडे पाठवली जाणार आहे

शिंदे – फडणवीस सरकारच्या 12 नावांची यादी राज्यपाल करणार का मंजूर?

शिंदे - फडणवीस सरकारच्या 12 नावांची यादी राज्यपाल करणार का मंजूर?

गेल्या अडीच वर्षात राज्यपाल आणि महाविकास आघाडीत राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या मुद्द्यावरून सतत खटके उडत होते. पण, सत्तपालट होताच हे चित्र काहीस बदललेलं दिसतंय. शिंदे – फडणवीस सरकार आता नव्या 12 नावांची यादी राज्यपालांकडे पाठवणार आहे. त्यामुळे आता त्या यादीच काय होणार हे पाहणं आता महत्वाचं ठरेल.

शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत येताच राज्यपाल नियुक्त नावांसाठी नव्या 12 नावांची यादी आता राज्यापालांकडे पाठवली जाणार आहे. आता महाविकास आघाडीची जुनी नावं राज्यपाल स्वीकारतील का? अशा चर्चांना उधाण आले आहे. तसेच शिंदे – फडणवीस पक्षातील कोणत्या नेत्यांना या 12 नावांच्या यादीत स्थान दिले जाईल याचा अंदाज आता लावला जात आहे.

आमदारांची संख्या पाहता एकूण 12 जागांपैकी 8 जागा भाजपला आणि 4 जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. पण, संधी नक्की कोणत्या नेत्यांना दिली जावी यावर लवकरच शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराजीत झालेल्या, विधापरिषदेत टर्म अजून शिल्लक असलेल्या की मग शिंदे – फडणवीस सरकारवार देले झाकून विश्वास ठेवणाऱ्या नेत्यांना नक्की कुणाला संधी मिळणार याची चर्चा आता सुरू झाली आहे.

राज्यपाल नियुक्त 12 नावांची संभाव्य यादी:

शिंदे गटातील संभाव्य यादी:
रामदास कदम
विजय बापु शिवतारे
आनंदराव अडसुळ किंवा अभिजित अडसुळ
अर्जुन खोतकर/ नरेश मस्के
चंद्रकांत रघुवंशी
राजेश क्षीरसागर

भाजपातील संभाव्य यादी:
हर्षवर्धन पाटील
चित्रा वाघ
पंकजा मुंडे
कृपाशंकर सिंग
गणेश हाके
सुधाकर भालेराव

महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल हा वाद चांगलाच रंगला होता. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियमावलीवरून महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये सतत खटके उडत होते.तर आता याच नियमावलीचा वापर राज्यपाल करतील का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

एकीकडे शिंदे फडणवीसांची कोर्टात अग्निपरीक्षा सुरु आहे तर दुसरीकडे दोघांनी सरकार चालवता असताना टॅाप गिअर टाकला आहे. आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने राज्यपाल नियुक्त सदस्यांची रणनीती सुरु आहे.

हे ही वाचा:

‘नो टू हलाल’,भोंग्यानंतर मनसेने हाती घेतली नवी मोहीम

सर्वांच्या लाडक्या लालबागच्या राज्याची अनोखी कहाणी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version