spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अनिल परबांच्या साई रिसॉर्टवर किरीट सोमय्यांचा हातोडा पडणार का? दापोलीतील राजकीय वातावरण तापलं

गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेते किरीट सोमय्या विरुद्ध माजी मंत्री अनिल परबयांच्यातील वादात केंद्रस्थानी राहिलेलं दापोलीतलं ‘साई रिसॉर्ट’ आज पाडलं जाणार आहे. अनिल परब यांच्या मालकीचं हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी सर्वात आधी केला होता. पर्यावरण विभागानं आखून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करून समुद्रकिनारी हे रिसॉर्ट बांधण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. यावर न्यायालयात रीतसर सुनावणी झाल्यानंतर अखेर आज दापोलीतील साई रिसॉर्टवर हातोडा पडणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेई वाचा : 

‘२ महिन्यात शिंदे- भाजप सरकार पडणार’, दानवेंच्या दाव्याला संजय राऊतांच्या दुजोरा

आज पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास भाजप नेते किरीट सोमय्या स्वत: मोठा हातोडा घेऊन दापोलीत दाखल झाले आहेत. दापोली पोलिस स्टेशनला भेट देऊन त्यांनी याप्रकरणी आपला जबाबही नोंदवला आहे. साई रिसॉर्ट परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिस व प्रशासनाने साई रिसॉर्टच्या पाडकामाची तयारी सकाळीच पूर्ण केली आहे. आजपासून पाडकामास सुरूवात झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हे रिसॉर्ट जमीनदोस्त होण्याची शक्यता वर्तवली आहे.

माजी मंत्री अनिल परब यांचे साई रिसॉर्ट सध्या तरी पडण्याची शक्यता नसून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने तूर्तास रिसॉर्ट मालकाला दिलासा मिळणार आहे. परंतु पुष्कर मुळे यांच्या मालकीचे असलेले सिकोंच रिसॉर्ट कोणत्याही क्षणी पाडले जाऊ शकते. किरीट सोमय्या दापोली पोलीस स्थानकाला भेट दिल्यानंतर मुरुड येथे प्रशासनाकडून कोणती तयारी केली याचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत.

PM Modi Death Threat : दाऊदच्या हस्तकांकडून मोदींच्या हत्येचा कट? मुंबई पोलिसांना माहिती

ठाकरेंचे भ्रष्टाचाराचे स्मारक

सोमय्यांनी सांगितले की, ठाकरे गटाचे भ्रष्टाचाराचे स्मारक आजपासून पाडण्यास सुरुवात होणार आहे. नवाब मलिक, अनिल देशमुख, संजय राऊत यांच्यानंतर आता तुरुंगात जाण्याची अनिल परब यांची वेळ आली आहे, असा इशाराही सोमय्यांनी दिला.

शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचा बचाव करणारे सीमावासियांना काय न्याय देणार? राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

Latest Posts

Don't Miss