शिंदे गटाला बसणार झटका? “ती” गोळी सदा सरवणकरांच्या बंदुकीतून निघाली, झालं स्पष्ट

दादर पोलीस ठाण्याच्या परिसरात झालेल्या गोळीबारात निघालेली गोळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांच्या बंदुकीतूनच सुटल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

शिंदे गटाला बसणार झटका? “ती” गोळी सदा सरवणकरांच्या बंदुकीतून निघाली, झालं स्पष्ट

सध्या महाराष्ट्रात सत्तासंघर्षांवरून वाद सुरु आहेत. तसेच शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकलेले नेहमीच पाहायला मिळतात. त्यातच आता काही महिन्यांपूर्वी दादरमधील प्रभादेवीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटात आणि शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर दादर पोलीस ठाण्याच्या परिसरात झालेल्या गोळीबारात निघालेली गोळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांच्या बंदुकीतूनच सुटल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. त्यामुळे सदा सरवणकर आणि पर्यायाने शिंदे गटाच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता आहे.

काही महिन्यांपूर्वी प्रभादेवीमध्ये गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर दादर पोलीस ठाण्याबाहेर गोळीबार देखील करण्यात आला होता. हा गोळीबार शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांनी केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. त्यानंतर ठाकरे गटाचा आरोप खरा असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार, ती गोळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याच बंदुकीतून सुटली असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी गणपती विसर्जनावेळी शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये दादर पोलीस ठाण्याच्या परिसरातच प्रचंड राडा झाला होता. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला असा आरॊप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी आपल्या बंदुकीतून गोळी सुटली नसल्याचा दावा सरवणकर यांनी केला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन मिळालेले काडतूसे आणि सदा सरवणकरांच्या बंदुकीचे नमुने तपासून पहिले. या प्रकरणी बॅलेस्टिक तज्ज्ञांचा अहवाल आला असून, या प्रकरणात सुटलेली गोळी ही सदा सरवणकर यांच्याच बंदुकीतून निघालेली आहे, हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे सरवणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता. प्रभादेवीमध्ये गणेश विसर्जनावेळी ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. यावेळी दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आदेश दिल्यानंतर हा वाद तात्पुरता क्षमला. परंतु त्यानंतर हा वाद पुन्हा उफाळून आला होता. यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाचे विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह त्यांच्या इतर समर्थकांना पिस्तूलीचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. त्यामुळे सरवणकर यांच्या विरोधात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर सदा सरवणकर यांनी त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. संबधित गुन्हा दाखल झाल्यानंतर सरवणकर यांच्याकडील बंदूक जप्त करण्यात आली होती. त्यासोबतच बंदुकीतून निघालेली काडतूसे आणि घटनास्थळावरून जमा करण्यात आलेले काही नमुने याची बॅलेस्टिक तज्ज्ञांनी चौकशी केली. त्यानंतर त्याचा अहवाल तज्ज्ञांनी तयार केला असून या अहवालानुसार सरवणकर यांच्या बंदुकीतूनच गोळी सुटल्याचं स्पष्ट झालं आहे.

त्यामुळे सरवणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अहवालानंतर सरवणकर यांच्यावर कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर सरवणकर यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

हे ही वाचा:

राशी भविष्य १२ जानेवारी २०२३, कामकाजात आज तुमची…

Makar Sankranti 2023 मकर संक्रांतीच्या दिवशी अशा सोप्या पद्धतीने घरच्या घरीच बनवा स्वादिष्ट खिचडी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version