राज्य सरकार शंभर रुपयांत तेल, रवा, डाळी देणार? या योजनेचं नेमकं झालं काय? – अजित पवार संतापले

राज्य सरकार शंभर रुपयांत तेल, रवा, डाळी देणार? या योजनेचं नेमकं झालं काय? – अजित पवार संतापले

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारने दिवाळीमध्ये स्वस्तात धान्य देण्याच्या केलेल्या घोषणेवर बोलतांना अजित पवार म्हणाले की, सरकारने शंभर रुपयांमध्ये दिवाळी गोड करणार असं सांगितलं होतं. शंभर रुपयांत तेल, रवा, डाळी देणार असं सांगितलं. त्याचं ५१३ कोटी रुपयांचं कंत्राटही दिलं पण अजूनही काही हालचाल दिसत नाहीये. या योजनेचं नेमकं काय झालं? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

अजित पवार पुढे म्हणाले, काल ते महाराष्ट्रातील विविध भागात पाहणी दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांना अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहे. शेतकरी म्हणाले, आम्हाला शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नसून कोणाला विचारायला गेले तर कोणीही याची दखल घेत नाही. तसेच यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाल्याचं अजित पवार म्हणाले. त्यामुळे राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. याबाबत त्वरित लक्ष देऊन राज्य सरकारने त्वरित कारवाई करण्याची गरज आहे. अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे.

दरम्यान अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदारांवर जोरदार टीका केलीय आहे. सरकारला १०० पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. नव्याचे ९ दिवस असतात हे मान्य. पण लोकप्रतनिधींना कशा पद्धतीने वागायचं याचं तारतम्य राहिलेलं नाही. यांचे लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना म्हणतात ‘तुमच्या बापाची पेंड आहे का? किती वाजता आला? तुमची वाट बघायला आम्ही काय तुमच्या बापाचे नोकर आहोत का? कानाखाली आवाज काढल्यानंतर तुम्हाला समजेल’. महाराष्ट्रात ही भाषा? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही का?” अशा शब्दांत अजित पवारांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना जाब विचारला आहे.

काही मंत्र्यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्या क्लिप नक्की कुणाच्या आहेत? हे कळायला हवं. मंत्र्यांना बदनाम करण्यासाठी तर अशा क्लिप व्हायरल करत नाही ना हे ही पाहायला हवं आणि जर खरोखरच ती क्लिप व्हायरल होत असतील तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. काम नाही का रे तुम्हाला, दिवसभरातून पाचशे फोन लावता. परीक्षा रद्द केलीय फोन ठेव, अशी भाषा वापरणं योग्य नाही, असंही अजित दादा म्हणालेत.

हे ही वाचा :

ऐन सणासुदीला नागरिक त्रस्त! गोकुळ दुधात दरवाढ, जाणून घ्या नवे दर

Bhediya Poster : ‘भेडिया’ सिनेमाचं नवं पोस्टर आऊट; कृती सेनॉनच्या लुकने प्रेक्षक थक्क!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version