spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अभ्यासक्रमातून लुटारू शब्द वगळणार का?; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेवर स्वारी करून लूट केली होती, असं पाठ्यपुस्तकातून शिकवलं जात आहे. मात्र, लूट या शब्दाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

काल मुंबईत टीव्ही9 मराठीने कॉन्क्लेव्हचं आयोजन केलं होतं. यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आले होते. यावेळी त्यांनी बोलताना शिवाजी महाराज खंडणी वसूल करायचे असं म्हटलं होतं. त्यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. जयंत पाटील यांच्या माफीनाम्याची मागणीही केली आहे. या वादावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेवर स्वारी करून लूट केली होती, असं पाठ्यपुस्तकातून शिकवलं जात आहे. मात्र, लूट या शब्दाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. माझा राजा लुटारू नव्हता. माझ्या राजाला मी कदापिही लुटारू म्हणणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. लुटारू या शब्दावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रमातून लुटारू हा शब्द वगळणार का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी सूचक उत्तर दिलं आहे. ज्यांच्या सरकारलाच खंडणी सरकार म्हटलं गेलं. त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल. पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की, जे खऱ्या अर्थाने इतिहासाचे अभ्यासक आहे, सदानंद मोरे असीतल, शिवरत्न शेट्ये असतील… या सर्वांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. माझं एकच म्हणणं आहे. माझा राजा लुटारू नव्हता. माझ्या राजाला लुटारू म्हणणं मी खपवून घेणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आज विघ्नहर्त्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना अभ्यासक्रमातून लुटारू हा शब्द वगळणार का? शिवाजी महाराजांचा तो धडा वगळणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझं स्पष्ट मत आहे की, महाराजांना लुटारू म्हणणं योग्य नाही. त्यांनी कधीही लूट केली नाही. सर्वसामान्यांना त्यांनी कधी त्रास दिला नाही. इतिहासात जर काही चुकीच्या गोष्टी आल्या असतील तर त्या सुधारल्या पाहिजे. कारण शेवटी इंग्रज इतिहासकाराने हे वर्णन केलं आहे. इंग्रजांच्या नजरेतून महाराजांना पाहाण्याऐवजी आपल्या इतिहासकारांनी एकत्र यावं आणि जिथे कुठे महाराजांबद्दल चुकीचं लिहिलं असेल ते सुधारण्याचा प्रयत्न करावा, असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

हे ही वाचा:

Ganeshotsav 2024: एक वाटी गव्हाचे पीठ आणि झटपट मोदक तयार…

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा!…

Ganeshotsav 2024: यंदाच्या गणपतीत बाप्पासाठी बनवा मूगडाळीचे 

Latest Posts

Don't Miss