spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mahayuti मध्ये आता पडणार फूट ? ; ‘मुख्यमंत्री लाडकी बाहीण योजना’ झाली ‘माझी लाडकी बहीण योजना’ !

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगवान हालचाली होताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत ज्याप्रकारे लढत झाली त्यावर आधारित ही विधानसभेची लढत होताना दिसणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात सत्ताधारी महायुतीचा धुव्वा उडाला. मिशन ४५ हाती घेणाऱ्या महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या. यानंतर महायुतीमधील तीन मोठ्या पक्षांनी एकमेकांवर आरोप सुरु केले. भाजपची मातृसंस्था असलेल्या संघानं अजित पवारांसोबतच्या युतीला पराभवासाठी जबाबदार धरलं. शिंदेसेनेनंही भाजप आणि अजित पवार गटाला लक्ष्य केलं. यानंतर आता अजित पवार गटात लक्षवेधी हालचाली सुरु आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दादा गटात अस्वस्थता वाढली. अनेक आमदारांनी शरद पवारांकडे परत जाण्याचे प्रयत्न सुरु केल्याच्या चर्चांनी जोर धरला. यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन दावे प्रतिदावे सुरु झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचे पोस्टर तयार केले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रचार, प्रसारासाठी अजित पवार गटानं छापलेल्या पोस्टरवर मुख्यमंत्र्यांचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. त्यामुळे महायुतीत क्रेडिट वॉर सुरु असल्याचं चित्र आहे.

नेमके प्रकरण काय आहे ?

सोमवारी (२२ जुलै) अजित पवारांचा वाढदिवस होता. त्या निमित्तानं नगर जिल्ह्यातील पारनेर, अहमदनगर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये दादांचा दौरा होता. या दौऱ्यावेळी माझी लाडकी बहीण योजनेचं पोस्टर लावण्यात आले होते. चारही मतदारसंघांमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये अजित पवारांनी महिलांना संबोधित केलं. त्यात त्यांनी योजनेचा उल्लेख माझी लाडकी बहीण योजना असा केला. खरं तर ही योजना मुख्यमंत्र्यांच्या नावानं आणण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असं योजनेचं नाव आहे. पण अजित पवारांनी मुख्यमंत्री शब्दाचा उल्लेख टाळला.

अजित पवारांनी महिलांशी संवाद साधत लाडकी बहीण योजनेची माहिती दिली. या योजनेतून महिलांना होणारे फायदे सांगितले. पण त्यांनी योजना सांगताना मुख्यमंत्री शब्द वारंवार टाळला. अजित पवारांच्या दौऱ्यासाठी गुलाबी रंगाचे पोस्टर लावण्यात आले होते. त्यावर अजित पवारांचा फोटो होता. पण मुख्यमंत्र्यांचा उल्लेख कुठेच नव्हता. याची बरीच चर्चा झाली. त्यावरुन अजित पवार गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. यावरुन कोणताही वाद निर्माण करण्याची गरज नाही. योजनेचं नाव माझी लाडकी बहीण असं आहे. त्यामुळे तोच उल्लेख बॅनरवर आहे. त्यात कोणतंच राजकारण नाही. कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला.

हे ही वाचा:

SANKASHTI CHATURTHI 2024: जाणूयात संकष्टी चतुर्थी विषयीची महती ; उपवास कसा करावा ते उपवास कसा सोडावा..

MCA ELECTION : अजिंक्य नाईक ठरले MCA च्या नव्या अध्यक्षपदाच्या विजयाचे मानकरी..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss