spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार, चंद्रकांत पाटील

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Assembly Constituency) पोटनिवडणुकीसाठी पालकमंत्री, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांनी तातडीने पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत कसब्यातील उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. तसेच, पोट निवडणुकीसाठी भाजपकडून रणनीतीही निश्चित केली जाणार आहे. या बैठकीमुळे निवडणुकीच्या घडामोडींना वेग मिळणार आहे.

पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा (Kasba and Chinchwad Assembly in Pune) मतदार संघासाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या. २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या पोटनिवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या जागेवर भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा आहे. या पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पोटनिवडणूक बिनविरोध न करण्याची भूमिका भाजप विरोधकांनी घेतली आहे. पोटनिवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबात भाजप नेतृत्वापुढे मोठे आव्हान आहे. माजी सभागृहनेते गणेश बीडकर आणि धीरज घाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, खासदार गिरीश बापट यांची स्नुषा स्वरदा यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत असतानाच दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश यांनीही उमेदवारीवर हक्क सांगितला आहे. टिळक कुटुंबीयांपैकी एकाचा विचार निवडणुकीसाठी व्हावा, अशी जाहीर भूमिका त्यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. निवडणुकीसाठीच्या उमेदवाराच्या नावावर या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाईल, असे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हे ही वाचा:

Balsaheb Thackeray Jayanti 2023, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील अखेरचा ‘राजकीय संवाद’ काय होता हे तुम्हाला माहित आहे का ? घ्या जाणून

हे सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं, एकनाथ शिंदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss