spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का ? यावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. अशा काळात सोशल मीडियावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी मागणी होत आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. अशा काळात सोशल मीडियावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी मागणी होत आहे. त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का ? याबाबत संभ्रम अजूनही आहे. दोन्ही नेत्यांचे चाहते, दोन्ही पक्षांच्या अनेक समर्थकांनी या नेत्यांना एकत्र येण्याची साद घातली आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशी मागणी करणारे बॅनर्स झळकले आहेत. त्यातच मनसे नेते अभिजीत पानसे यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्यामुळे या चर्चांना अजूनच उधाण आलं आहे. यावर गुरुवारी ७ जुलै रोजी मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही प्रतिक्रिया दिली.

देशपांडे म्हणाले, मनसेने आतापर्यंत दोन वेळा त्यांना युतीचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे आम्ही आता असा कोणताही प्रस्ताव पाठवण्याचा प्रश्नच येत नाही. दोन वेळा त्यांनी (उद्धव ठाकरे) प्रस्ताव का नाकारला याबद्दल त्यांना विचारा असंही देशपांडे म्हणाले. दरम्यान, यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंशी बोलण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. ना उद्धव ठाकरेंना, ना राज ठाकरे यांना, दोघांनाही अशा कुठल्याही मध्यस्थाची (अभिजीत पानसे यांच्या भेटीच्या आशयाने) गरज भासत नाही. दोन भाऊ कधीही एकेमेकांशी बोलू शकतात. त्यासाठी कोणी आमच्याकडे येऊन बोलण्याची गरज नाही. असे देखील संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, माझी आणि राज ठाकरे याची मैत्री सर्वानाच माहिती आहे. आत्ता आमचे राजकीय मार्ग वेगळे आहेत. परंतु याआधी आम्ही आमच्या आयुष्याचा एक मोठा भाग एकमेकांना दिला आहे. आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तसेच ते दोन भाऊ (राज-उद्धव) कधीही एकमेकांशी बोलू शकतात. आम्हीही बोलू शकतो. त्यासाठी कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही.

हे ही वाचा:

पंकजा मुंडे यांनी पक्षावर केला आरोप

ठाकरे गटाचा आणखी एक शिलेदार कमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss