spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Winter Assembly Session हिवाळी अधिवेशन गाजणार, सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे येणार आमनेसामने

उद्या दि १९ डिसेंबरपासून नागपूरमध्ये विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Nagpur Winter Assembly Session) सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाची पूर्ण तयारी झाली आहे. विविध मुद्यांवरुन हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Winter Assembly Session : उद्या दि १९ डिसेंबरपासून नागपूरमध्ये विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Nagpur Winter Assembly Session) सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाची पूर्ण तयारी झाली आहे. विविध मुद्यांवरुन हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच या अधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आमने-सामने येण्याची शक्यता आहे. नागपुरात (Nagpur) पार पडत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतरचं नागपुरात होणारं हे पहिलंच अधिवेशन असणार आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे सुरुवातीचे दोन दिवस (सोमवार आणि मंगळवार) सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे हे उद्या नागपुरात दाखल होणार आहेत.

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचंही हे पहिलंच अधिवेशन असणार आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं. शिवसेनेचे ४० आणि अपक्ष दहा असे ५० आमदार घेऊन त्यांनी सवतासुभा मांडला. त्यानंतर भाजपशी हातमिळवणी करून त्यांनी सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपदही मिळवलं. शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिंदे आणि ठाकरे कधीच समोरासमोर आले नव्हते. मुंबईत झालेल्या अधिवेशनाला उद्धव ठाकरे यांनी दांडी मारल्याने शिंदे-ठाकरे समोरासमोर येण्याचा योग जुळून आला नाही. आता नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने हा योग जुळून येणार आहे. उद्धव ठाकरे नागपूर अधिवेशनात दोन दिवस उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते अधिवेशनाच्या कामकाजात भाग घेणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. उद्याचं हिवाळी अधिवेशन फार वेगळं असेल असा दावाही संजय राऊत यांनी केला.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. त्यानंतर २ वाजता विरोधी पक्षांची पत्रकार परिषद होईल. दुसरीकडे संध्याकाळी ५. ३० वाजता कॅबिनेटची बैठक होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे. दरम्यान, सायंकाळी ५ वाजता चहापानाचा कार्यक्रम होणार आहे.

या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजच नागपूरला रवाना होणार आहेत. दुपारी १२.१५ वाजता त्यांचे नागपूरमध्ये आगमन होणार आहे. दुपारी १ वाजता एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वनभवनाचे उद्घाटन होणार आहे. तर दुपारी १.३० वाजता वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार तसेच बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे. दुपारी तीन वाजता अल्पसंख्याक विभागाच्या विविध योजनांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन होणार आहे. तर सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीयांशी संवाद साधत चहापानाचा कार्यक्रम होईल.

शिंदे आणि ठाकरे पहिल्यांदाच एकत्र येणार असल्याचं राऊत यांनीही स्पष्ट केल्याने उद्धव ठाकरे हे शिंदे यांना कसे धारेवर धरतात आणि शिंदे हे त्यांना कसे प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दोन्ही नेते एकमेकांना भेटणार का? एकमेकांशी नजरेला नजर भिडवणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा : 

Nashik Gram Panchayat Election 2022 नाशिक जिल्ह्यात मतदान प्रक्रियेला सुरुवात, तर ७ ग्रामपंचायत बिनविरोध

‘हर हर महादेव’मध्ये स्त्रियांचा बाजार, संभाजीराजेंचा चित्रपटाला विरोध

‘मविआ’च्या महामोर्चासाठी पैसे देऊन गर्दी जमवली, व्हिडीओ शेअर भाजपने केला गंभीर आरोप

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss