Thursday, July 4, 2024

Latest Posts

मुंबईसह, पुण्यात राष्ट्रवादीचं सरकार विरोधात ‘लॉलीपॉप’ आंदोलन

सध्या महाराष्ट्रामध्ये वेदांती फॉक्सकॉन प्रकरण खूप गाजत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये होणार वेदांती फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात घेऊन गेल्याची माहिती मिळाली आणि आता विरोधकांनी शिंदे, फडणवीस सरकारला चांगलंच धारेवरती धरल्याचे दिसत आहे. आज महाविकास आघाडीकरून महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे.

 आज सकाळपासून पुण्यामध्ये राष्ट्रवादीचं लॉलीपॉप आंदोलन सुरु आहे. तर मुंबईमध्ये सुद्धा राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात येत आहे. पुण्याच्या आंदोलनात सुप्रिया सुळे या स्वतः उपस्थित आहेत. ‘मोदी के राज मे लॉलीपॉप हात मे’ अश्या प्रकाचे घोषणा राष्ट्रवादीकडून देण्यात येत आहेत. तर मुंबईच्या आंदोलनाच्या काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ‘सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती हे’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.

कोरोना पुन्हा आला, गेल्या २४ तासांत देशात हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

मुंबई पोलिसांकडून मुंबईमधील राष्ट्रवादीच्या आंदोलकरीता परवानगी देण्यात आली नाही. तरी राष्ट्रवादीकडून मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आलं आणि त्या आंदोलनादरम्यान कर्यकर्यांना ताब्यात घेण्यात आले . महाराष्ट्रामधून वेदांत प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आल्यामुळे विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच निशाण्यावर घेतल आहे. कालपासून राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. सगळे राष्ट्रवादीचे मोठे नेते रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीनंतर शिवसेना-युवासेना सुद्धा मैदानात उतरणार आहे. युवासेनामार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकार विरोधात निषेध करण्यात आला. काल युवासेना सचिव वरून सरदेसाई यांनी या निषेध मोहीमची घोषणा केली आहे.

महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक गुजरातमध्ये नेऊन महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या मागास बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जीएसटी संकलनात महाराष्ट्राचे मोठे नुकसान होणार आहे. असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील शिंदे-भाजप सरकारवर केला आहे. महाराष्ट्रातील आगामी वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प राजकीय दबावामुळे गुजरातमध्ये हलवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले आहे.

हे ही वाचा:

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक ‘या’ दिवशी होणार

दसऱ्याच्या मुहूर्तावर रिलीज होणार प्रभास आणि सैफ अली खानच्या आदिपुरुषचा टीझर?

Engineer’s Day 2022: भारतातील पहिली महिला इंजिनिअर कोण होती?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss