‘दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही’, संजय राऊतांनी केला गंभीर आरोप

बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणखी चिघळला आहे.

‘दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही’, संजय राऊतांनी केला गंभीर आरोप

बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणखी चिघळला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी फोनवरुन संवाद साधला पण त्यांचा आडमुठेपणा दिसला. अशातच बेळगावात जाण्याचा शिंदे गटाच्या मंत्र्यात दौरा सतत लांबणीवर पडत आहे. यासर्वांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना केंद्रावर गंभीवर आरोप केले आहेत. तसेच, पवारांच्या नेतृत्वात बेळगावला जाणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी मुंबईत आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

ज्या सरकारला राज्याच्या सीमा राखता येत नाहीत, त्या सरकराला एक मिनिटही सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचे संजय राऊत म्हणाले. कर्नाटक महाराष्ट्रातील काही भागावर दावा सांगत असताना सरकार तोंडाला कुलूप लावून बसले आहे. यांना कुलूप निशाणी द्या असे राऊत म्हणाले. ताबडतोब बेळगावसह सीमाभाग केंद्रशासीत प्रदेश करा, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात (Belgaum) मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही, असा आरोप राऊत यांनी केला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपवण्याचा खेळ सुरू झाला आहे. बेळगावातील हल्ले हा त्याच कटाचा भाग असल्याचे राऊत म्हणाले.

गेल्या २४ तासापासून सीमाभागामध्ये महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड होत आहे. प्रतिकार करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. मग महाराष्ट्र सरकार आहे की नाही? असा सवाल राऊतांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवस हे केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटायला दिल्लीत जात आहे. त्यांना भेटून काय उपयोग, त्यांना कळत नाही का? महाराष्ट्रात काय चाललयं ते असा सवालही राऊतांनी केला. महाराष्ट्राचे लचके तोडता यावेत म्हणूनच शिवसेनेचं सरकार घालवलं असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्रातवर गेल्या ५५ वर्षात अशी वेळ आली नव्हती. एवढे हतबल मुख्यमंत्री, एवढं लाचार सरकार महाराष्ट्रानही कधीही पाहिलं नाही असे राऊत म्हणाले.

“महाराष्ट्राचे लचके सहजतेनं तोडता यावेत म्हणून शिवसेनेचं सरकार घालवलंय, असं म्हणत संजय राऊतांनी भाजप आणि शिंदे गटावर थेट तोफ डागली. अशाप्रकारची वेळ महाराष्ट्रावर कधीच आली नव्हती. इतके हतबल मुख्यमंत्री, इतके लाचार सरकार या महाराष्ट्रानं गेल्या ५५ वर्षांत पाहिलेलं नाही. दोन मंत्र्यांनी काल शेपुट घातलं, जाणार होतो. हे म्हणे मर्द आणि स्वाभिमानी. काय चाललंय या राज्यात. डरपोक सरकार! ज्यांना आपल्या महाराष्ट्रातील जनतेची काळजी नाही. महाराष्ट्राच्या सीमांची काळजी नाही, सीमा कुरतडल्या जातायत या राज्यांच्या. ज्या १०५ हुतात्म्यांनी रक्ताचं पाणी करुन, बलिदान करुन हा महाराष्ट्र आणि मुंबई मिळवली आहे. कोणी याबाजुला कुरतडतंय, कुणी त्या बाजुनं कुरतडतंय. आणि हे सरकार षंडासारखं, नामर्दासारखं बसलेलं आहे. हो नामर्दच सरकार आहे.”, असं संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा : 

सीमा वादाचे पडसाद राज्यभर, औरंगाबादमध्ये युवा सेना आक्रमक

शिंदे आणि बोम्मई यांच्यात फोनवरून चर्चा, तरी बोम्मईंचा आडमुठेपणा कायम

Parliament Winter Session आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version