मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी श्रींची प्रतिष्ठापना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी श्रींची प्रतिष्ठापना

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं आहे. गणेशोत्सवाच्या शुभप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी सहपत्नी श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी शिंदे यांचे संपूर्ण कुठुंब उपस्थित होते. मुख्यमंत्री यांनी सर्व गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प करूया. असं म्हणत यावर्षीचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त होणार असल्याचं पुन्हा एकदा त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे झाले ९२ वर्षांचे; जाणून घेऊया त्यांचे 5 गुंतवणूक मंत्र

त्याचबरोबर गणेशाचे आगमन आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी घेऊन येवो. व गणेशोत्सव साजरा करताना सर्वांनी सामाजिक भान राखणे गरजेचं आहे. राज्यातील गणेश मंडळाने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे अवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

मूर्ती विसर्जनातून होणाऱ्या प्रदूषणाबाबत नागपूर खंडपीठाने करून घेतली याचिका दाखल

त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट वर गणरायचा फोटो शेअर करत देशवासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्वीटर वर त्यांनी एक श्लोक शेअर करत गणरायाची कृपा कायम राहो यासाठी प्रार्थना केली आहे. त्याचबरोबर देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनीही देशवासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

दसरा मेळावा घेऊन बोलण्यासारखं आता उरले तरी काय , नारायण राणे यांचा ठाकरेंना खोचला टोला

Exit mobile version