‘तीन नंबरचा गाळ’ शेतकऱ्याच्या मुलाला भेटते; आमदार Devendra Bhuyar यांचे महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य

‘तीन नंबरचा गाळ’ शेतकऱ्याच्या मुलाला भेटते; आमदार Devendra Bhuyar यांचे महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य

अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे आता नव्या अडचणीत सापडले आहेत. काल (मंगळवार, १ ऑकटोबर) एका कार्यक्रमात उपस्थितांनाही संवाद साधत असताना त्यांनी महिलांबाबत अतिशय वादग्रस्त विधान केले असून आता नवा वाद निर्माण झाला आहे. महिलांच्या दिसण्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे आता देवेंद्र भुयारांवर चोहोबाजूंनी चांगलीच टीका होत आहे. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनीही यावरून भुयारांवर निशाणा साधला असून, “महिला का उपभोगायचे साधन आहे का ? अशा प्रकारे तुम्ही वर्गीकरण कसे करु शकता ?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

आमदार देवेंद्र भुयार यांचे पुन्हा महिला बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “मुलगी जर दिसायला चांगली असेल तर ती तुमच्या माझ्या सारख्याला भेटत नाही तर ती नोकरीवाल्या मुलाला भेटते. दोन नंबरची मुलगी पानटपरीवाल्याला किंवा किराणा दुकानदाराला भेटते. तीन नंबरचा गाळ जो राहिलेली पोरगी ती शेतकऱ्याच्या मुलाला भेटते म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खर राहिले नाही. जन्माला येणार जे लेकरू आहे ते हेबाळ निघत राहते, माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी वानराचे पिल्लू असाच कार्यक्रम आहे,” असे अतिशय वादग्रस्त विधान त्यांनी केले.

यावरून आता इतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी यावरून चांगलालाच निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, “मला आश्चर्य वाटते ज्या ठिकाणी अजित पवार यांचा लाडक्या बहिणीचा कार्यक्रम होतो आणि त्याच ठिकाणचे आमदारांचा महिलांकडे अपशब्दांमध्ये बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे. महिला ही जननी आहे, तुम्ही त्याचे वर्गीकरण करू शकत नाही, ती संसार चालवत असते. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. महिलांच्या मतांसाठी तुम्ही जीवाचं रान करत आहात व दुसरीकडे महिलांचे वर्गीकरण करून महिलांचा अपमान करत आहे, त्यामुळे तुमची मानसिकता काय आहे ते समजत आहे. महिला का उपभोगायचे साधन आहे का ? अशा प्रकारे तुम्ही वर्गीकरण कसे करु शकता ? अजित पवार आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोल मध्ये ठेवावं, अशा प्रकारचा महिलांचा वर्गीकरण कोणीही खपून घेणार नाही. तुम्हाला संसार आणि समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,” असे त्या म्हणाल्या.

हे ही वाचा:

‘अमित शहांना स्वप्नदोष झालाय,’ Amit Shah यांच्या वक्तव्यावर Sanjay Raut यांचा टोला

पूरग्रस्त राज्यांना मदतीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून निधी, महाराष्ट्राला मिळाले ‘इतके’ कोटी रुपये!

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version