एकनाथ शिंदे धमकी प्रकरणावर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया; सहानुभूती मिळवण्यासाठी….

एकनाथ शिंदे धमकी प्रकरणावर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया; सहानुभूती मिळवण्यासाठी….

काही दिवसांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोने येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती देणार फोन त्यांना आला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात सुद्धा याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहे. माजी मंत्री तथा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. सहानुभूती मिळवण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. राज्यात दर्जेदार राजकारण व्हावे, अशी इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राची अवस्था अशी झाली आहे, की आजकाल मुख्यमंत्र्यांनाही धमकीचा फोन येत आहे. ते सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अफवा पसरवल्या जात आहेत. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत दर्जेदार राजकारण केलेले आहे. यापुढेही महाराष्ट्राकडून असेच राजकारण होईल, अशी आमची अपेक्षा आहे, असे यशोमती ठाकुर माध्यमांशी बोलतांना सांगितले.

एकनाथ शिंदेंना धमकी मिळाल्याच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे गटातील नेते विनायक राऊत यांनी या प्रकरणाची देशतील सर्वोच्च तपास यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणी केली. “एकनाथ शिंदे यांना जर धमकीचे फोन आले असतील, तर मी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करतो की, त्यांनी या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करावी. तसेच उच्चस्तरीय चौकशीनंतर तपासात उघड झालेल्या बाबी संपूर्ण महाराष्ट्रासमोर उघड कराव्यात,” असे विनायक राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

Eknath Shinde : दसरा मेळाव्यापूर्वी मुख्यमंत्र्यानी केली मोठी घोषणा

Uddhav thackeray : ‘मर्द असतो तो याच लढाईची वाट बघतो’; शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा आणखी एक टीझर लॉन्च

Follow Us

Exit mobile version